Pimpri News : दिव्यांगांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्रे सुरू करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाला वेग आला आहे. सध्या देशात दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू आहे. विविध लसीकरण केंद्रावर लस दिली जात आहे. मात्र, दिव्यांग नागरीकांना लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेणे त्रासाचे व गैरसोयीचे होत आहे. त्यामुळे दिव्यांगांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्रे सुरू करण्याची मागणी केली जात आहे.

पिंपरी चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून, रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. अशात लसीकरण वाढवण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.

_MPC_DIR_MPU_II

सध्या लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू असून, येत्या 1 मे पासून अठरा वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे. लसीकरण केंद्रांवर दिव्यांग नागरिकांची गैरसोय होत त्यामुळे दिव्यांनी नागरिकांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्रे सुरू करण्याची मागणी स्वयंसेवी संस्था करत आहेत.

दरम्यान, देशात लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 12 कोटी 71 लाख 29 हजार 113 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.