Pimpri News : कृषी महाविद्यालयांच्या शिष्यवृत्ती योजनेचे अनुदान विद्यार्थांच्या खात्यात जमा करा – गजानन बाबर

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या काळात विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या अडचणीत असून विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षण थांबू नये यासाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदने सर्व विद्यार्थांच्या खात्यामध्ये शिष्यवृत्ती योजनेची रक्कम जमा करावी, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे.

कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या महासंचालकांना लिहलेल्या पत्रात त्यांनी हि मागणी केली आहे. महाराष्ट्रातील कृषी महाविद्यालयात शिकत असलेल्या काही विद्यार्थ्यांना 2019-2020 या शैक्षणिक वर्षातील राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना आणि डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना या योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना अजून पर्यंत मिळालेला नाही. या योजनेची रक्कम विद्यार्थांच्या खात्यात त्वरीत जमा करावी, अशी मागणी या पत्रात केली आहे.

कृषी पर्यावरण शिक्षण आणि नागरी समस्या निवारण संघटनेचे सचिव गणेश बाबर, खजिनदार विठ्ठल रांजणे, उपाध्यक्ष मिलिंद यादव सोळस्कर, सदस्य जयवंत पवार, लक्ष्मण निंबाळकर, प्रदीप आर्यमाने, संजय जाधव, ऋतुराज फडतरे, पश्चिम महाराष्ट्र विभागीयअध्यक्ष रणजितसिंह देशमुख, समन्वयक मंगेश निंबाळकर, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सचिन कारेकर, सातारा जिल्हाध्यक्ष संतोष यादव सोळस्कर, युवा नेते ऋषिकेश मस्के, युवा नेते सर्वजीत बोंडगे, योगेश वेदपाठक, महेश गोळे, सातारा जिल्हा समन्वयक अश्विनी करे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष ऋतुजा भोसले, युवा नेत्या प्रज्ञा जाधव, सोनाली शिंदे ,मोनाली शिंदे, करिष्मा मनेर, सलोनी वाला, अमृता बोबडे, अंजली कोरडे, सई मोहिते, राजश्री गायकवाड, आरती वाघ, प्रतिक्षा भिसे, दिपाली जगताप, रंभा गोफने, तृप्ती भोसले सायली शिंदे, रोशनी मोहिते, नेहा भोंगाळे, आश्लेषा शेलार, प्रतिक्षा गोसावी, सलोनी पाताडे, राजेश्वरी काळे, अदिती थोरात, प्राजक्ता पवार, सुकन्या मंथाले यांनी हि मागणी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.