Pimpri News: नेहरुनगर येथे PMPMLसाठी डेपो बांधणार, 7 कोटींचा खर्च

एमपीसी न्यूज – पिंपरी, नेहरुनगर मुख्य रस्त्यावरील आरक्षण क्रमांक 66 मध्ये पीएमपीएमएल साठी बस डेपो बांधणे आणि अनुषंगिक कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी येणाऱ्या 6 कोटी 75 लाख इतक्या खर्चाससह विविध विकासकामांच्या झालेल्या आणि येणाऱ्या सुमारे 48 कोटी 16 लाख रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.

महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज ऑनलाइन पद्धतीने पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. नितीन लांडगे होते. प्रभाग क्रमांक 14 आकुर्डी येथील विवेकनगर भागातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे अंतर्गत विद्युत विषयक कामे करण्याकामी येणा-या 31 लाख 92 हजार, कोविड- 19 या विषाणूचा प्रादुर्भाव लक्षता घेता अत्यावश्यक बाब म्हणून 66 बेड करीता येणाऱ्या 92 लाख 88 हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

रावेत अशुद्ध जलउपसा केंद्र येथिल पवना नदीमधील आणि इनटेक चॅनेल मधील गाळ कचरा काढण्याकामी येणाऱ्या 46 लाख 17 हजार इतक्या खर्चास, गणेशनगर थेरगाव पंप हाऊस येथील पंपाची क्षमता वाढविणे तसेच अतिरिक्त पंप बसिवण्याकामी येणा-या 65 लाख 55 हजार इतक्या खर्चास, रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्र टप्पा क्रमांक 1 ते 4 पंपमधील गाळ काढणेकामी येणा-या 28 लाख 3 हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्रमांक 16 मधील रावेत भागातील रावेत गावठाण ते समीर लॉन्स पर्यंत १८ मीटर डी.पी. रस्ता आणि इतर रस्ते विकसित करणेकामी येणाऱ्या 1 कोटी 68 लाख इतक्या खर्चास, अजमेरा टाकी परिक्षेत्रातील पाण्याच्या टाक्यांचे परिचालन करणे व किरकोळ दुरूस्तीची कामे करण्याकामी येणा-या 77 लाख 49 हजार, ओटास्किम येथील विविध झोपडपट्टयामधील अंतर्गत गल्ल्यामध्ये स्ट्रॉर्म वॉटर आणि इतर स्थापत्य विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करण्याकामी येणा-या 52 लाख 56 हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

निगडी येथील बुद्धनगर, विलासनगर व सभोवतालच्या परिसरातील गटर पाथवे व इतर स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या 25 लाख 4 हजार, बोपखेल रामनगर ते बोपखेल गावठाण रस्त्यास फुटपाथ व दुभाजक करण्याकामी येणाऱ्या 55 लाख 31 हजार, लसीकरण केंद्र उभारण्याकामी इच्छुक संस्थांकडून, ज्यांना वैद्यकीय सेवेअंतर्गत मनुष्यबळ पुरविण्याचा अनुभव आहे. अशा संस्थांकडून सदर कामकाजाकरीता मनुष्यबळ उपलब्ध करण्याकामी येणा-या 75 लाख 22 हजार इतक्या खर्चास, प्रभाग क्रमांक 18 मधील दर्शन नगरी ते संत गार्डन बिल्डींग पर्यंतचा रस्ता अर्बन स्ट्रीट डिझाईन नुसार विकसीत करण्यासाठी येणा-या 1 कोटी 99 लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.