Pimpri News : वीज समस्या सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांना साकडे!

एमपीसी न्यूज – भोसरी विधानसभा मतदार संघाअंतर्गत औद्योगिक आणि घरगुती वीज ग्राहकांना भेडसावणाऱ्या (Pimpri News) समस्या सोडवण्याकरिता महावितरण प्रशासनाने पायाभूत सुविधा सक्षम कराव्यात. तसेच, प्रस्तावित प्रकल्प आणि विकासकामे मार्गी लावावीत, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, भोसरी विधानसभा मतदार संघात औद्योगिक आणि निवासी अशा दोन्ही पट्टयातील वीज ग्राहकांना नियमितपणे वीज समस्यांना सामोरे जावे लागत आहे. समाविष्ट गावांत मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली असून, त्या तुलनेत वीज यंत्रणा सक्षम करण्यात आलेली नाही. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी काही विकासकामे तात्काळ मार्गी लावणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने राज्य सरकारकडे खालीलप्रमाणे कामे प्रस्तावित आहेत. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध झाल्यास सदर कामे मार्गी लावता येतील.

यामध्ये प्राधान्याने सफारी पार्क मोशी अतिउच्चदाब (ई.एच.व्ही.) उपकेंद्र उभारण्यात यावे. त्याळे मोशी, डुडुळगांव, आकुर्डी, चिखली, तळवडे या भागातील औद्योगिक व निवासी पट्टयातील वीज पुरवठा सुरळीत होणार आहे. चऱ्होली अतिउच्चदाब (ई.एच.व्ही.) उपकेंद्र उभारण्यात यावे. ज्यामुळे भोसरी, चऱ्होली, दिघी, धानोरी या भागात पुरेशा दाबाने वीज पुरवठा करण्यासाठी मदत होणार आहे.

भोसरी गावठाणे येथील नवीन स्विचिंग उपकेंद्र, ओव्हरहेड वीज वाहिन्याचे भूमिगत वाहिन्यांमध्ये रुपांतर करणे, तळवडे येथील देवी इंद्रायणी स्विचिंग उपकेंद्रातून स्वतंत्र फिडर बे व भूमिगत काम तातडीने करण्याची योजना राबवणे, नवीन उपविभाग व शाखा कार्यालय स्थापित (Pimpri News) करणे अत्यावशक आहे, असे आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.

भोसरी उपविभागाचे दोन उपविभाग होणार – 

भोसरी विभागांतर्गत भोसरी एमआयडीसी तसेच सभोवतालच्या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. औद्योगिक, घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांची संख्याही वाढलेली आहे. त्यामुळे ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा देण्यासाठी कुशल प्रशासकी नियंत्रणासाठी भोसरी उपविभागाचे दोन उपविभाग करणे गरजचे आहे. भोसरी उपविभाग क्र. 1 अंतर्गत भोसरीगांव शाखा, नाशिकरोड शाखा कार्यालय आणि चऱ्होली शाखा कार्यालय स्थापन करणे आवश्यक आहे.

Pune : पानशेत पुरग्रस्त पुनर्वसित सहकारी सोसायटींच्या भाडेपट्टा जमिनीसंदर्भात राज्यशासन सकारात्मक

तसेच, भोसरी उपविभाग क्र. 2 अंतर्गत इंद्रायणीनगर शाखा कार्यालय (नवीन प्रस्तावित), मोशी शाखा कार्यालय, आकुर्डी उपविभाग अंतर्गत चिखली शाखा कार्यालय (नवीन प्रस्तावित) उभारण्याची आवश्यकता आहे. याबाबत ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आगामी काळात महावितरण पायाभूत सुविधांची निर्मिती करण्याला गती मिळेल, अशी अपेक्षा आमदार लांडगे यांनी व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.