_MPC_DIR_MPU_III

Pimpri news: विकासकामाला मिळाली गती; नगरसेवक संदीप वाघेरे यांचा अधिकाऱ्यांसोबत प्रभाग पाहणी दौरा

एमपीसी न्यूज – पिंपरी प्रभाग क्रमांक 21 मधील स्थापत्य, पाणी पुरवठा, जलनिस्सारण, विद्युत, स्थापत्य उद्यानाच्या कामाला गती मिळाली आहे. या विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत नगरसेवक संदीप वाघेरे यांनी पाहणी दौरा केला.

_MPC_DIR_MPU_IV

प्रभाग क्रमांक 21 मधील स्थापत्य,पाणी पुरवठा, जलनिस्सारण, विद्युत, स्थापत्य उद्यान विभागामार्फत करण्यात येणारी महत्वपूर्ण कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यासंदर्भात आज (बुधवारी) बैठक झाली आहे. बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

त्यात स्थापत्य विभागाकडील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, ग्रामदेवत भैरवनाथ मंदिर, पिंपरीगाव स्मशानभूमी, जोग महाराज बहूउद्देशीय इमारत, 162 प्ले. ग्राऊंड, नाल्यावरील स्लॅब, अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण, शाळेचे विस्तारीकरण, जिजामाता रुग्णालयास सीमाभिंत बांधणे, मिलिंदनगर येथील कमान आदी कामे पूर्ण करण्याच्या सूचना वाघेरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

तसेच पाणीपुरवठा विभागाकडील नवमहाराष्ट्र विद्यालय येथील व म्हाडा अमेनीटी स्पेसमधील उंच पाण्याची टाकी तसेच डिलक्स पाण्याची टाकीस बुस्टर बसविणे, अमृत योजनेतील लाइन टाकणे, विद्युत विभागाकडील सोलर सिस्टिम, शाळा इमारतीस प्यूरिफायर बसविणे, प्रभागामध्ये सुशोभित पोल बसविणे,  उद्यान स्थापत्य विभागामार्फत छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील म्युरल्स जोग महाराज उद्यान येथे बसविणे, हरिभाऊ दिनाजी वाघेरे उद्यानाचे नूतनीकरण करण्याच्या सूचना नगरसेवक वाघेरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.