Pimpri News:  खासदार श्रीरंग बारणे यांच्या निधीतून पिंपरी-चिंचवडमध्ये विकासकामे सुरू

एमपीसी न्यूज  – मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या स्थानिक विकास निधीतून पिंपरी-चिंचवड शहरात विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. 

चिंचवड येथील विविध गृहनिर्माण सोसायटी आणि निगडी, प्राधिकरणातील गृहनिर्माण सोसायटीच्या आवारात पेव्हिंग ब्लॅाक बसविण्यास सुरुवात केली आहे. खासदार बारणे यांच्या हस्ते या कामाचे रविवारी (दि.27) भूमीपूजन करण्यात आले. सुमारे 55 लाखांची कामे सुरू करण्यात आली आहेत.

शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांच्या पुढाकाराने चिंचवड येथील विविध गृहनिर्माण सोसायटीत खासदार निधीतून पेव्हिंग ब्लॅाक बसविण्याचे काम हाती घेतले आहे.

सुखकर्ता सोसायटीत रविवारी खासदार बारणे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी गजानन चिंचवडे, अश्विनी चिंचवडे, प्रकाश मिठभाकरे, गर्जेकाका तसेच  सोसायटीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच यामध्ये लक्ष्मीगंगा, मोरू सोसायटी, श्री सोसायटी, रघुवंश सोसायटी, केतकी सोसायटी 13 लाख रुपये, संत गार्डन सोसायटी व यशोधन सोसायटी 12 लाख, चिंचवड मधीलच संत गार्डन सोसायटी व यशोधन गृहनिर्माण सोसायटीत 15 लाख रुपयांच्या पेव्हिंग ब्लॅाकचे काम करण्यात येणार आहे, निगडी, प्राधिकरणातील गंगानगर परिसरात पेव्हिंग ब्लॅाक बसविण्यास सुरुवात केली आहे. इंडियन कार्ड सोसायटी व साईकृपा गृहनिर्माण सोसायटीत 15 लाख रुपयांची कामे सुरू केली आहेत. भाजप नगरसेविका शर्मिला बाबर, राजेंद्र बाबर, अमोल निकम यांसह सोसायटीतील नागरिक उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले, मार्चपूर्वी आलेल्या खासदार निधीपैकी चिंचवडमध्ये 55 लाखांची विकासकामे केली जात आहेत.  तर, 15 लाखांची कामे निगडी प्राधिकरणात करण्यात येत आहेत. मार्चपूर्वीचा 100 टक्के विकास निधी संपवला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकप्रतिनिधींचा विकास निधी 100 टक्के बंद केला आहे. परंतू, मार्चपूर्वीच्या विकास निधीतून पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात विकासकामे काढली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.