Pimpri News : धनराज बिर्दा व तुषार सोनवणे यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व भाजपचे शहर उपाध्यक्ष धनराज बिर्दा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहर संघटक तुषार सोनवणे यांनी वंचित यांनी वंचित बहुजन आघाडीत आज (दि.25) जाहीर प्रवेश केला.

बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर व महासचिव अनिल जाधव यांच्या उपस्थितीत हा जाहीर प्रवेश पार पडला.

धनराज बिर्दा हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व भाजपचे शहर उपाध्यक्ष होते. तर, तुषार सोनवणे यांनी पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहर संघटक म्हणून काम पाहिले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.