Pimpri News: श्रीराम मंदिर भूमीपूजनाला शुभेच्छा दिल्या म्हणून पार्थ इमॅच्युअर झाले का?

भाजपचे प्रदेश कार्यसमिती निमंत्रित सदस्य एकनाथ पवार यांचा सवाल ; Did Partha become immature as he wished good luck to Shriram Temple Bhumi Pujan?

एमपीसी न्यूज – लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत शरद पवार यांनी स्वत: माघार घेऊन पार्थ पवार यांना पक्षाची उमेदवारी दिली. तेव्हा ते मॅच्युअर होते. आता पार्थ यांनी अयोध्यानगरीतील श्रीराम मंदिराच्या भूमीपूजनाला शुभेच्छा दिल्या म्हणून अचानक ते इमॅच्युअर झाले का, असा सवाल भाजपचे प्रदेश कार्यसमिती निमंत्रित सदस्य, पिंपरी पालिकेचे माजी सभागृह नेते एकनाथ पवार यांनी केला आहे.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी केली होती.

त्यावर भाष्य करताना ”नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत नाही. तो इमॅच्युअर आहे. माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे” असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटले आहे.

त्यावर भाजपचे प्रदेश कार्यसमिती निमंत्रित सदस्य, पिंपरी पालिकेचे माजी सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले, लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत शरद पवार यांनी स्वत: माघार घेऊन पार्थ पवार यांना पक्षाची उमेदवारी दिली होती. तेव्हा ते मॅच्युअर होते.

आता पार्थ पवार यांनी अयोध्यानगरीतील श्रीराम मंदिराच्या भूमीपूजनाला शुभेच्छा दिल्या म्हणून अचानक ते इमॅच्युअर झाले का, असा सवाल त्यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.