_MPC_DIR_MPU_III

Pimpri news: पक्षाने शहराची जबाबदारी सोपविली का ? खासदार अमोल कोल्हे म्हणतात…

एमपीसी न्यूज – अनेकजण मला अजूनही नेता कमी अभिनेता अधिक मानतात. अभिनेता हा नेहमी चित्रपटात काय आहे हे अगोदरच पूर्ण सांगत नाही. त्यामुळे हा तर ट्रेलर आहे, पुढे काय होते ते पाहू, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शहरात लक्ष घालणार असल्याचे संकेत दिले आहेत.

_MPC_DIR_MPU_IV

शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, पदाधिकारी यांची बैठक शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज शुक्रवारी घेतली. यावेळी त्यांनी नगरसेवकांशी संवाद साधला. प्रश्न जाणून घेतले.

बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ‘आपल्यावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जबाबदारी सोपवली आहे का?’, असे पत्रकारांनी विचारले असता’ मला अजूनही लोक नेता कमी अभिनेता अधिक मानतात. अभिनेता हा नेहमी चित्रपटात काय आहे? हे सांगत नाही. त्यामुळे हा तर ट्रेलर आहे, पुढे काय होते ते पाहू, असे म्हणत त्यांनी सूचक इशारा दिला.

_MPC_DIR_MPU_II

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एकमुखी नेतृत्व राहिले आहे. 2017 च्या महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला.

भारतीय जनता पक्षाकडे पक्षाने एकहाती सत्ता मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ला उध्वस्त केला. शहरात सर्वांगीण विकास करूनही, अपेक्षित यश न मिळाल्याने अजित पवार नाराज आहेत.

आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहराची जबाबदारी अजित पवार हे अमोल कोल्हे यांच्यावर सोपविणार का, याकडे राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह स्थानिक जनतेचे लक्ष लागले आहे.

 

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.