Pimpri News :  ‘भाजयुमो’पिंपरी चिंचवड शहर सरचिटणीसपदी दिनेश यादव यांची निवड

एमपीसीन्यूज : चिखली-कुदळवाडी येथील स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांची भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. काळेवाडी येथील भाजपच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ही निवड करण्यात आली.

भाजप शहराध्यक्ष आमदार पै. महेशदादा लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष संकेत चोंधे यांच्या हस्ते यादव यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

यावेळी महापौर माई ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष उज्वला गावडे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे उपस्थित होते.

स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी चिखली- कुदळवाडी भागात लॉकडाऊन कालावधीत नागरिकांना जीवनावश्यक साहित्याचा पुरवठा, अन्नदान, परराज्यातील मजुरांना त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी बसेसची सुविधा उपलब्ध करणे, कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी परिसरात औषध फवारणी, सॅनिटायझर, मास्क, होमियोपॅथी गोळ्यांचे वाटप असे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत.

त्यांच्या या सेवाभावी कार्याची दखल घेत  त्यांची  भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे.

दिनेश यादव यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. तसेच या निवडीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.