Pimpri news: ऑक्सिजन जनरेटर प्लांटचे थेट पद्धतीने कामकाज; 6 कोटींचा खर्च

0

एमपीसी न्यूज – पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या भोसरी, जिजामाता, आकुर्डी आणि थेरगाव रुग्णालयात बसविण्यात येणाऱ्या मेडिकल ऑक्सिजन जनरेटर प्लांटचे थेट पद्धतीने कामकाज देण्यात आले आहे. त्यासाठी ठेकेदारांना 50 टक्के आगाऊ रक्कम बिनव्याजी देण्यात आली आहे. या कामासाठी एकूण सहा कोटी 10 लाख रुपयांचा खर्च येणार आहे. त्यातील तीन कोटी 5 लाख रुपयांची रक्कम ठेकेदारांना ऍडव्हान्समध्ये देण्यात आली आहे.

स्थायी समितीच्या आज (बुधवारी) झालेल्या सभेत याबाबतच्या विषयाला आयत्यावेळी कार्योत्तर मान्यता देण्यात आली.

कोरोना काळात ऑक्सिजनची मोठी मागणी वाढली आहे. कोरोनाच्या गंभीर, अतिगंभीर रुग्णांना ऑक्सिजनची मोठी आवश्यकता भासत आहे. ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांची धावाधाव होत आहे.

ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत. ऑक्सिजनची गरज ओळखून महाराष्ट्रात आतापर्यंत जवळपास तीनशे ऑक्सिजन जनरेटर प्लांट बसविण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

राज्यातील विविध महापालिकांनी ऑक्सिजन जनरेटर प्लांट बसविण्याचे काम हाती घेतले आहे. थेट पद्धतीने त्याचे काम दिले आहे. त्याअनुषंगाने पिंपरी महापालिकेच्या नव्याने उभारण्यात आलेल्या भोसरी, जिजामाता, आकुर्डी याठिकाणी 960 एलपीएम व थेरगाव रुग्णालयात 1050 एलपीएम क्षमतेचे ऑक्सिजन जनरेटर प्लांट बसविण्यात येणार आहेत.

_MPC_DIR_MPU_II

कोरोना बाधित रुग्णाच्या उपचाराकरिता पर्यायी व्यवस्था असण्यासाठी ऑक्सिजन मेडिकल प्लॅट निर्मिती करिता महापालिकेच्या नवीन भोसरी, जिजामाता, आकुर्डी, थेरगाव रुग्णालयासाठी आवश्यक उपकरण ऑक्सिजन जनरेटर प्लॉट खरेदी करणे आवश्यक आहे.

एकाच वेळी सर्व शासनस्तरावर बहुतांशी जिल्ह्यात प्लॉन्ट उभारण्याचे काम युध्दपातळीवर सुरु असल्याने ऑक्सिजन जनरेटींग प्लॉन्ट उभारण्याचे काम करणा-या पुरवठा धारकांचाही तुटवडा निर्माण झाला आहे.अशा परिस्थितीत मेडिकल ऑक्सिजन जनरेटर प्लॉट यंत्रणा तातडीने पुरवठा करून कार्यान्वित करून देण्याबाबत महापालिकेने पुरवठादाराकडून थेट पध्दतीने दर पत्रके आणि स्पेशिफिकेशन मागविले होते.

चिंचवड येथील प्राईम सर्जिकल अँड फार्मा यांच्याकडून सादर केलेला प्रस्ताव व दरपत्रकाबाबत वैद्यकीय तज्ज्ञ सल्लागार समितीने 25 एप्रिल रोजी दर कमी करून घेण्याबाबत विचारणा करून प्राप्त दर स्वीकृत करण्यात आले. त्यानुसार प्रति युनिट 1 कोटी 40 लाख अधिक जीएसटी याप्रमाणे तीन रुग्णालयांसाठी तीन युनिट करीता चार कोटी 20 लाख रुपये खर्च येणार आहे.

भोसरी, जिजामाता, आकुर्डी याठिकाणी 960 एलपीएमचा प्लांट बसविण्यासाठी चिंचवड येथील प्राईम सर्जिकल अँड फार्मा यांच्याकडून थेट पध्दतीने तीन युनिट खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी 4 कोटी 20 लाख रुपये खर्च येणार आहे.

तर, थेरगाव रुग्णालयासाठीचे 1050 एलपीएमचे ऑक्सिजन जनरेटर प्लांट क्षमतेचे एक युनिट मशीन पुण्यातील मे ड्रग हाऊस यांच्याकडून 1 कोटी 90 लाख रुपयांना थेट पध्दतीने खरेदी केले जाणार आहे.

असे चार युनिट मशीन खरेदीसाठी सहा कोटी 10 लाख रुपयांचा खर्च येणार आहे. त्यातील तीन कोटी 5 लाख रुपयांची रक्कम ठेकेदारांना ऍडव्हान्समध्ये देण्यास आणि त्यांच्या सोबत करारनामा करण्यास स्थायी समितीच्या बैठकीत आयत्यावेळी मान्यता देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment