Pimpri News: कोरोना सेंटरसाठी 25 हजार पीपीई कीट, मास्कची थेट खरेदी

80 लाखाचा खर्च

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे दवाखाने, रूग्णालये, ऑटो क्लस्टर कोरोना रूग्णालय तसेच अण्णासाहेब मगर क्रीडा संकुल येथील जम्बो कोविड सेंटर या ठिकाणी हजार पीपीई कीट आणि एन 95 मास्क तसेच इतर साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. निविदा प्रक्रीयेतील दुस-या लघुत्तम निविदाधारकाकडून हे साहित्य थेट पद्धतीने खरेदी केले जाणार आहे. त्यासाठी 80 लाख रूपये खर्च होणार आहे.

कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी महापालिकेकडून आवश्यक ती दक्षता घेण्यात येत आहे. पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीत बाधीत रूग्ण वाढत आहेत.

महापालिकेचे दवाखाने, रूग्णालये, ऑटो क्लस्टर कोरोना रूग्णालय, अण्णासाहेब मगर क्रीडा संकुल येथील जम्बो कोविड सेंटर या ठिकाणी कोरोना बाधीत रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन 25 हजार पीपीई कीट आणि एन 95 मास्क तसेच इतर साहित्य खरेदी करण्यात येणार आहे.

हे साहित्य तातडीने उपलब्ध करून मिळण्यासाठी वैद्यकीय विभागामार्फत मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने पीपीई कीट आणि एन 95 मास्क खरेदी करण्यासाठी अल्पमुदतीची निविदा मागविण्यात आली होती.

या निविदा प्रक्रीयेमध्ये पिंपरीतील ओमनी हेल्थ केअर यांनी प्रति कीट 321रूपये अधिक जीएसटी असा लघुत्तम दर सादर केला. या निविदा प्रक्रीयेमध्ये पात्र झालले दुसरे लघुत्तम निविदाधारक सुपर प्लास्टीक कॉर्पोरेशन यांची निविदा स्विकृत करण्यात आली आहे.

त्यांच्याकडून प्राप्त निविदा लघुत्तम दर 321 रूपये अधिक जीएसटी प्रति किटप्रमाणे 25 हजार पीपीर्अ किट खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी 80 लाख 25 हजार रूपये अधिक जीएसटी एवढा खर्च होणार आहे. त्यानुसार, त्यांच्यासमवेत करारनामा करून थेट पद्धतीने खरेदी करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.