Pimpri News : आयसीयूबेडसाठी 500 ऑक्सिजन जम्बो सिलिंडरची थेट खरेदी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या थेरगाव आणि आकुर्डी रुग्णालयाकरिता आयसीयू बेडसह इतर बेड उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यासाठी ऑक्सिजन जम्बो सिलिंडर खरेदी करण्यात येणार आहेत. नागपूर येथील एका कंपनीकडून 500 सिलिंडर थेट पद्धतीने खरेदीसाठी 90 लाख रुपये अधिक जीएसटी असा खर्च होणार आहे. या खरेदीपोटी 25 टक्के म्हणजेच 22 लाख 50 हजार रुपये आगाऊ व्याज आकारणी न करता कंपनीला देण्यात येणार आहेत.

महापालिकेच्या थेरगाव आणि आकुर्डी रुग्णालयाकरिता आयसीयू बेड आणि इतर बेड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी ऑक्सिजन जम्बो सिलिंडर खरेदी करण्यात येणार आहेत. व्हेंटिलेटर अपुरे पडत आहेत. त्यामुळे नागपूर येथील कॉनफिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेड यांनी 11 मे 2021 रोजीच्या मेलद्वारे आपला दर कळविला. प्रतिनगाप्रमाणे 18 हजार रुपये अधिक जीएसटी यानुसार मेडिकल ऑक्सिजन जम्बो सिलिंडरच्या 500 नगांसाठी 90 लाख रुपये अधिक जीएसटी असा दर त्यांनी सादर केला.

त्यानुसार, 500 मेडिकल ऑक्सिजन जम्बो सिलिंडर त्यांच्याकडून थेट पद्धतीने खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी पुरवठा आदेशही जारी करण्यात आला आहे. त्यानुसार, कॉनफिडन्स पेट्रोलियम इंडिया यांना 90 लाख रुपयांच्या 25 टक्के म्हणजेच 22 लाख 50 हजार रुपये या खरेदीपोटी आगाऊ व्याज आकारणी न करता देण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.