Pimpri News: दिग्दर्शक सुजय डहाके यांना यावर्षीचा ‘पिंपरी चिंचवड युवा प्रेरणा’ पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सुजय डहाके हे दिग्दर्शन, निर्मिती आणि लेखन दृश्यात्मक कथांसाठी प्रसिध्द आहे. कारकिर्दीच्या पदार्पणातच त्यांच्या 'शाळा' चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड फिल्म क्लबच्यावतीने देण्यात येणारा पिंपरी- चिंचवड युवा प्रेरणा पुरस्कार 2020 यावर्षी राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक, लेखक सुजय सुनील डहाके यांना जाहीर करण्यात आला आहे. प्रसिध्द छायाचित्रकार सुधाकर ओलवे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड फिल्म क्लबचे संचालक अविनाश कांबीकर आणि दत्ता गुंड यांनी याबाबत माहिती दिली आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सुजय डहाके हे दिग्दर्शन, निर्मिती आणि लेखन दृश्यात्मक कथांसाठी प्रसिध्द आहे. कारकिर्दीच्या पदार्पणातच त्यांच्या ‘शाळा’ चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.

सुजय डहाके यांनी आजपर्यंत आजोबा, फुंतरू व केसरी या चित्रपटाच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांना हात घातला आहे. तसेच सेक्स, ड्रग्ज ॲन्ड थिएटर’ नावाची डिजिटल वेब सिरीजचे दिग्दर्शनही सुजय यांनी केले आहे.

मागील वर्षी गोव्याला पार पडलेल्या इफ्फी मध्ये ‘च्या आयला’ या त्यांच्या चित्रपटाचा सहभाग होता तसेच त्यांना पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल मध्ये ही विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

मागील वर्षी पिंपरी-चिंचवड फिल्म क्लबच्यावतीने प्रसिध्द छायाचित्रकार दिग्दर्शक अविनाश अरुण यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. पिंपरी-चिंचवड फिल्म क्लब आयोजित दुसरा पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय लघुचित्रपटाच्या ऑनलाइन महोत्सवास प्रेक्षकांचा प्रचंड सहभाग मिळाला. या महोत्सवासाठी दिग्दर्शक रमेश होलबोले, हर्षवर्धन धतुरे यांनी विशेष सहाय्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.