Pimpri News: महापालिकेतील शिक्षण समिती बरखास्त, कोरोनामुळे नवीन नियुक्ती नाही

महापालिकेतील शिक्षण समितीचा एक वर्षाचा कार्यकाल 8 ऑगस्ट रोजी संपला आहे. त्यामुळे ही समिती देखील बरखास्त झाली आहे. सभापतींच्या दिमतीला असलेली मोटार नगरसचिव विभागाने काढून घेतली आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विषय समित्यानंतर आता शिक्षण समिती देखील कार्यकाल संपल्याने बरखास्त झाली आहे. यामुळे समितीचे अधिकार महासभेकडे गेले आहेत. दरम्यान, विधी, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण आणि कला, क्रीडा, सांस्कृतिक चार विषय समित्या कार्यकाल संपल्याने जूनमध्येच बरखास्त झाल्या आहेत. कोरोनामुळे राज्य सरकारच्या आदेशानुसार नवीन नियुक्ती होणार नाही.

कोरोनामुळे पुढील आदेशापर्यंत विषय समित्यांच्या नवीन नेमणूका करू नयेत असा राज्य सरकारचा आदेश आहे. त्यानुसार पालिकेच्या विधी, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण आणि कला, क्रीडा, सांस्कृतिक समितीचा एक वर्षांचा कार्यकाळ 14 जून रोजी संपला आहे.

समितीचा एक वर्षाचा कार्यकाळ संपल्याने आणि पुढील आदेशापर्यंत निवडणूक घेण्यात येवू नयेत असा आदेश असल्याने या समित्या यापूर्वीच बरखास्त झाल्या होत्या.

महापालिकेतील शिक्षण समितीचा एक वर्षाचा कार्यकाल 8 ऑगस्ट रोजी संपला आहे. त्यामुळे ही समिती देखील बरखास्त झाली आहे. सभापतींच्या दिमतीला असलेली मोटार नगरसचिव विभागाने काढून घेतली आहे.

तर, पालिकेतील त्यांच्या दालनावरील नावाची पाटी देखील काढली आहे. समितीचे अधिकार आता महासभेकडे गेले आहेत. दरम्यान, आता स्थायी आणि जैवविविधता या दोनच समित्या महापालिकेत आहेत.

विषय समित्या गठित करण्याचे अधिकार महासभेला आहेत. परंतु, विषय समित्यांच्या नवीन नेमणूका करु नयेत असा राज्य सरकारचा आदेश आहे. जोपर्यंत राज्य सरकार तो आदेश मागे घेत नाही. अथवा विषय समित्यांच्या नवीन नेमणुका करण्यास मान्यता देत नाही. तोपर्यंत महासभेला विषय समित्यांचे गठन करता येणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.