Pimpri news: पालिकेत डेटा-एंट्रीसाठी बेकायदेशीररित्या नियुक्ती केलेल्या प्रशिक्षणार्थीची निवड रद्द करा – राहुल कोल्हटकर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत मागील वर्षी कोपा-पासा प्रशिक्षण पूर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थीची कोरोनाच्या डेटा-एंट्रीसाठी मानधनावर बेकायदेशीर नियुक्ती रद्द केल्याचा आरोप करत या सर्व बेकायदेशीर नियुक्त्या रद्द करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांनी केली आहे.

याबाबत माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात कोल्हटकर यांनी म्हटले आहे की, भारतामध्ये सर्वत्र कोविड 19 या संसर्गजन्य रोगाची साथ चालू असल्याने गेली 8 महिने लॉकडाऊनमुळे अनेक स्थानिक तरुणाचे रोजगार गेले आहेत.

अनेक सुशिक्षित तरुण बेरोजगार झालेले आहेत. असे असताना आपण पालिकेत कोरोनाच्या Data Entry करिता मानधनावर नेमणूक करण्याकामी जाहिरात दिली होती. या जाहिरातीस अनुसरून अनेक तरुणानी अर्ज केले होते. परंतु, ही जाहिरात रद्द करून पालिकेमध्ये मागील वर्षी कोपा-पासा प्रशिक्षण पूर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थीची मानधनावर नियुक्ती केली.

मागील वर्षी कोपा-पासा प्रशिक्षण पूर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थीची निवड करताना ती कोणत्या आधारावर केली ? तसेच त्याकामी कोणता शासन निर्णय अथवा कोणत्या नियम नियमावलीच्या अन्वये ही नियुक्ती दिली ?, असा सवाल कोल्हटकर यांनी उपस्थित केला आहे.

या प्रशिक्षणार्थीची 3 महिन्यानंतर नियुक्ती संपुष्टात आल्यानंतर पदवीधर विधानपरिषद निवडणूक आचारसंहिता असल्याने त्यांना मुदतवाढ दिली नाही. आता आचारसंहिता असताना पुन्हा त्यांना नियुक्ती दिली याचा खुलासा द्यावा.

वास्तविकता पालिकेमध्ये कोरोनाची Data Entry करणेकामी यावर्षी आपणाकडे असलेल्या कोपा-पासा प्रशिक्षणार्थीची निवड केली असती, तर कसलीही शंका उपस्थित नसती झाली.

परंतु, तसे न करता कोणताही नियम अथवा शासन निर्णय काहीही नसताना बेकायदेशीरित्या ही नियुक्ती केलेली आहे. ही नियुक्ती रद्द करून त्याजागी यावर्षाकरिता पालिकेमध्ये कोपा-पासा प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थीची नियुक्ती करण्यात यावी; अन्यथा योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करून बेकायदेशीर नियुक्ती विरूद्ध आंदोलन करण्याचा इशारा कोल्हटकर यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.