Pimpri News : मराठी राजभाषा दिनानिमित्त 100 कवितासंग्रह वाटप

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसीन्यूज : महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद आणि पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन आणि मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे महाराष्ट्रातील नामवंत कवींच्या कवितासंग्रहांचे नागरिकांना वाटण्यात आले.

महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, पुणे विभाग प्रमुख कवी राजेंद्र वाघ, पिंपरी चिंचवड विभाग प्रमुख सुरेश कंक, कवी शामराव सरकाळे, सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर दळवी यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला. तसेच त्यांना 100 कवितासंग्रह प्रेमपूर्वक प्रदान केले.

यावेळी पुरुषोत्तम सदाफुले म्हणाले, ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस आहे. कविता माणसाला जगण्याची उर्मी देते. कवितासंग्रह भेट देण्यातून एक नवा कवी निर्माण व्हावा, हा उद्देश आहे. यासाठीच हा कार्यक्रम घेतला आहे.

सुरेश कंक यांनी मराठी भाषेचा जागर करणारी घोषवाक्य वेशभूषा केली होती.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.