Pimpri News: माजी विरोधी पक्षनेते शरद बाराहाते यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नधान्य वाटप

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते
शरद बाराहाते यांनी आपला वाढदिवस अंत्यत साधेपणाने साजरा केला. या निमित्त त्यांनी काळभोरनगर येथील मदर तेरेसा होम येथे मोफत अन्नधान्य वाटप केले. तसेच क्रांतिवीर चापेकर विद्यालयातील अनाथ विद्यार्थ्यांना खाऊ व धान्यवाटप करण्यात आले.

या प्रसंगी पद्मश्री गिरीश प्रभुणे, माजी उपमहापौर केशव घोळवे, उद्योजक नरेश कदम, उमेश गुंजोटे, श्रीरंग काळभोर, मंदार सुळे, सुमित बरेलीकर, चंद्रकांत सरडे, विठ्ठल काळभोर, जितेद्रं बाराहाते, विजय कदम, सतिश बाराहाते आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

शरद बाराहाते यांनी कोरोना प्रादुर्भामुळे इतर कार्यक्रम रद्द करून मुख्यमंत्री सहायता निधीला मदत दिली. क्रांतिवीर चापेकर विद्यालयातील अनाथ विद्यार्थ्यांना खाऊ, धान्यवाटप तसेच वाल्हेकरवाडीतील मोनी बाबा वृध्दाश्रम येथील वृध्दांना नित्योपयोगी तेल, साबण, टुटपेस्ट, साखर, चहापाडर आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच स्मशानभूमीतील कर्मचा-यांना पीईपी कीट व मास्कचे वाटप करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.