Pimpri News: क्षयरोग रुग्णांची माहिती लपवू नका; अन्यथा फौजदारी : महापालिकेचा इशारा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी वैद्यकिय व्यावसायिक, पॅथोलॉजी लॅब, रेडिओलॉजीस्ट, औषधविक्रेते यांना त्यांच्याकडे निदान झालेल्या क्षयरुग्णांची नोंद विहीत नमुन्यात शासनाकडे करणे बंधनकारक आहे. याबाबतची माहिती लपविणार्‍यांवर फौजदारी केली जाणार असल्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.

2025 पर्यंत आपला देश क्षयरोग मुक्त करावयाचा आहे. त्यामुळे भारत सरकारने क्षयरोगास धोकादायक यादीमध्ये घेतले आहे. सर्व खासगी वैद्यकिय व्यावसायिक, पॅथोलॉजी लॅब, रेडिओलॉजीस्ट व औषधविक्रेते यांना त्यांच्याकडे निदान झालेल्या क्षयरुग्णांची नोंद विहीत नमुन्यात शासनाकडे सादर करणे बंधनकारक आहे.

_MPC_DIR_MPU_II

त्यामुळे नवीन निदान झालेल्या सर्व क्षयरुग्णांची माहिती शहर क्षयरोग अधिकारी व जीत संस्था यांना [email protected], [email protected] या ई-मेल वर दर महिन्याच्या 25 तारखेपर्यंत कळविण्यात यावी.

याचे उल्लंघन केल्यास कलम 269 –अन्वये निष्काळजीपणे जिवीतास हानी पोहचवणा-या रोगाचा फैलाव होणे, 6 महिने कारावास / दंड व दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

कलम 270 – अन्वये घातक कृत्यामुळे जिवीतासहानी पोहचणा-या रोगाचा फैलाव करणे – 1 वर्ष कारावास / दंड व दोन्ही शिक्षा होऊ शकतात, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.