Pimpri News: चौकशी सुरु असलेल्या संस्थेला काम देवू नका; भाजप नगरसेवकाचे आंदोलन

एमपीसी न्यूज – विभागीय आयुक्तांची चौकशी प्रलंबित असणाऱ्या मे. गॅब एंटरप्रायजेस या संस्थेला ऑक्सिजन पुरवठा करण्याचे पाच कोटींचे काम देण्यात येऊ नये, अशी मागणी करत सत्ताधारी भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी आज (बुधवारी) आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले.

नगरसेवक कामठे यांनी म्हटले आहे की, गॅब एंटरप्रायजेस ही संस्था कायम वादग्रस्त ठरली आहे. प्रशासन व माजी महापौरांच्या सांगण्यावरुन या संस्थेला काम देण्याचा अट्टहास घालण्यात आला. या संस्थेची विभागीय चौकशी सुरु असून सुद्धा वैद्यकीय विभागाने या संस्थेस काम दिले. 9 जून रोजी वायसीएम रुग्णालयात ऑक्सिजन गॅसची गळती झाली होती.

या गॅस गळतीची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी सुरू आहे. ही संस्था महापालिका रुग्णालयात ऑक्सिजन पुरविल्याचे दाखवून पालिकेकडून त्याचे पैसे घेते. प्रत्यक्षात मात्र ऑक्सिजन खासगी रुग्णालयास पुरविते असा आरोप नगरसेवक कामठे यांनी केला आहे.

यासंदर्भात पुरावे देऊनही आयुक्त पाटील दखल घेत नसल्याने आयुक्त दालनासमोर ठिय्या आंदोलन केल्याचेही त्यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.