सोमवार, डिसेंबर 5, 2022

Pimpri News : ‘जुनी भांडणे सर्वांना सांगतो काय’, असे म्हणून इसमावर खुनी हल्ला 

एमपीसी न्यूज – ‘जुनी भांडणे सर्वांना सांगतो काय’, असे म्हणून तरुणावर खुनी हल्ला केला. इसमाला कोयता, चॉपर आणि बांबूने मारहाण करून जखमी केले. मिलिंद नगर पिंपरी येथील एफ बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये बुधवारी (दि.20) ही घटना घडली. याप्रकरणी दोघांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. 

राहुल बापुराव टोणपे (वय 26, रा. मिलिंद नगर पिंपरी) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे. त्यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विशाल पवार (वय 31, रा. पिंपरी) आणि अक्षय येवले (वय 21) या दोघांना पिंपरी पोलिसांनी याप्रकरणी अटक केली आहे. तसेच, तन्वीर युसुफ शेख (ताडीवाला) (वय 28, रा. काळेवाडी) आणि अतुल पवार (वय 28, रा. पिंपरी) असे गुन्हा दाखल इतर दोन आरोपी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी एफ बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये थांबले होते. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी ‘जुनी भांडणे सर्वांना सांगतो काय’, असे म्हणून इसमावर खुनी हल्ला केला. इसमाला कोयता, चॉपर आणि बांबूने मारहाण करून जखमी केले. असे फिर्यादीत म्हटले आहे. दोन आरोपी अटक असून, पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Latest news
Related news