Pimpri News : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्र निर्मितीमधील योगदान नव्या पिढीसाठी दीपस्तंभासारखे प्रेरणादायी – महापौर ढोरे

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या संकल्पनेवर आधारित राष्ट्र निर्मितीसाठी आणि मानव कल्याणासाठी आपले आयुष्य पणाला लावून सतत संघर्षशील राहून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रासाठी दिलेले योगदान अनन्यसाधारण आहे. तसेच नवोदित पिढीसाठी ते दिपस्तंभासारखे प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरणार आहे. असे प्रतिपादन महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपरी येथील त्यांच्या पुतळ्यास महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, आयुक्त श्रावण हर्डीकर, मनसे गटनेते सचिन चिखले, अ प्रभाग अध्यक्षा शर्मीला बाबर, प्रभाग अध्यक्ष सागर आंगोळकर, आबासाहेब त्रिभुवन, माजी उपमहापौर तुषार हिंगे, नगरसदस्या सुलक्षणा शिलेवंत – धर, माजी नगरसदस्य रामचंद्र माने, अंकुश कानडे, मारुती भापकर, माजी नगरसदस्या चंद्रकांता सोनकांबळे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, सम्यक विद्यार्थी आंदोन पिपरी चिंचवडचे शहराध्यक्ष संतोष जोगदंड, बापुसाहेब गायकवाड, गणेश भोसले, धम्मराज साळवे, प्रकाश भुक्तर, राहूल सोनवणे, लक्ष्मण माने आदी उपस्थित होते.

महापौर माई ढोरे म्हणाल्या, भारतीय संविधानाच्या माध्यमातून शोषित, वंचित घटकांना आपले हक्क अधिकार मिळावेत यासाठी डॉ. बाबासाहेबांनी दिलेले योगदान महत्वपूर्ण आहे. स्त्रियांसाठी त्यांनी दिलेला लढा स्त्री मुक्तीसाठी आदर्शव्रत आहे. बाबासाहेबांच्या समताधिष्ठ लढ्यामुळे महिलांना देखील समानतेची संधी मिळून त्या विविध क्षेत्रात आपले नेतृत्व सिद्ध करीत आहेत. असे सांगून नवीन पिढीने बाबासाहेबांच्या विचारांचे अवलोकन करुन राष्ट्र निर्मितीमध्ये आपले योगदान दयावे असे आवाहन महापौर माई ढोरे यांनी केले.

त्यापूर्वी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर एच. ए. कॉलनी, पिंपरी येथील पुतळयासही महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. दापोडी येथे झालेल्या कार्यक्रमात महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.