Pimpri News : डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालयात पॅरालीसीस ट्रीटमेंट युनिट सुरु

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालयात अद्ययावत सुसज्ज असे पॅरालीसीस आयुर्वेद ट्रीटमेंट सेंटर सुरू करण्यात आले आहे. सल्लागार डॉ. बी.पी. पांडे यांच्या हस्ते मंगळवारी (दि.29) या सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.

कुलपती डॉ. पी. डी. पाटील, डॉ. भाग्यश्री पाटील यांच्या प्रेरणेतून व ट्रस्टी डॉ. स्मिता जाधव यांच्या संकल्पनेतून हे सेंटर साकारण्यात आले आहे.

विशेष पॅरालीसीस ट्रीटमेंट युनिट विषयी माहिती देताना प्राचार्य डॉ. जी. एच. येवला म्हणाले, पक्षाघात पॅरालिसिसमुळे येणारे अपंगत्व व व्याधी तसेच जीर्ण पक्षाघात पॅरालिसिस यावर आयुर्वेद उपचार, पंचकर्म उपचार त्याच बरोबर आवश्यकतेनुसार ऍलोपॅथी उपचार केले जातील. पॅरालीसीस रुग्णाला शक्य तितक्या लवकर दैनंदिन व्यवहार स्वतंत्रपणे करण्यासाठी आयुर्वेद व पंचकर्म उपचार महत्त्वाचे ठरतात. पक्षाघात झालेला रुग्ण अंथरुणाला खिळून न राहता डॉक्टरांच्या प्रयत्नांनी तो बरा होऊ शकतो व आपली दिनचर्या पार पाडू शकतो‌.

सुसज्ज अशा या युनिटसाठी डॉ. डी. जी. दीपंकर, डॉ. प्रशांत खाडे, डॉ. पृथ्वीराज उगळे, डॉ. अभिजित शेखर, डॉ. प्रणेश गायकवाड या पाच डॉक्टरांची विशेष टीम कार्यरत असणार आहे. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रशांत खाडे, कुलसचिव दिलीप मोहिते, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. पृथ्वीराज उगळे, अमोल पाटील तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालय नॉन कोव्हीड हॉस्पिटल असून येथे सर्व आजारांवर उपचार करण्यात येत आहेत व सर्व आवश्यक काळजी घेऊन प्रसूती सुविधा उपलब्ध आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.