Pimpri News : भारत सरकारच्या फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या ’महाराष्ट्र सल्लागार समिती सदस्य’ पदावर डॉ. लालबाबू गुप्ता यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – विश्व श्री राम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष  डॉ.लालबाबू गुप्ता (Pimpri News) यांची  भारत सरकारच्या फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या ’महाराष्ट्र सल्लागार समिती सदस्य’पदी नियुक्ती करण्यात आली आहे.  ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे सचिव अजय कुमार सिंह यांनी नियुक्ती आदेश पत्र जारी केले आहे.

 

या सल्लागार समितीचे मुख्य काम ग्राहकांच्या तक्रारी, धान्य गोदामांसंबंधी घोटाळा, सरकारी रेशन दुकाने, वाद-विवाद, गडबडीच्या तक्रारी ऐकणे आणि त्यांचे निराकरण करणे हे असेल. तसेच ग्राहकांच्या समस्या ऐकून घेणे आणि भारतीय अन्न महामंडळ, भारत सरकार यांना वेळोवेळी सूचना व जनहिताच्या माहिती देणे. या सल्लागार समितीमध्ये एकूण 40 सदस्य असतील.

 

 

Alandi News : गुढीपाडव्यानिमित्त माऊली मंदिरामध्ये गर्दी

डॉ. लालबाबू गुप्ता हे भारत सरकारच्या सेंटर फॉर गुड गव्हर्नन्सचे अध्यक्ष आहेत. विश्व श्री राम सेना सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व विश्व मैत्री संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहे. दोन्ही संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्र, बिहार, यूपी, मध्य प्रदेश येथे सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कार्य केले जात आहे. श्रीराम गुरुकुल आणि श्रीराज गुरुकुलच्या माध्यमातून 800 हून अधिक मुलांच्या वैद्यकीय, आधुनिक, संगणकीय शिक्षणाद्वारे भविष्य घडवत आहेत. महाराष्ट्र, वृंदावन, बिहार, मध्य प्रदेश या ठिकाणी ते गौशाळेच्या माध्यमातून मातेची सेवा करत आहेत, अयोध्येत धर्मशाळेच्या माध्यमातून ते परदेशातून येणार्‍या भक्तांची आणि संतांची सेवा (Pimpri News) करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.