Pimpri News : त्यांच्या सहृदयतेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अनुभवले तारांगण

एमपीसी न्यूज – तारे, चंद्र हे म्हणजे मुलांचे बालपणापासूनचे आकर्षण हे च कुतुहल ग्रामीण भागातील मुलांनी अनुभवले त्याला कारण ठरले एक सदगृहस्थ, पैशांअभावी हताश होऊन परतणारी मुले त्यांना बघवली नाहीत त्यांनी लगेच 40 मुलांचे तिकीट काढले अन मुलांना (Pimpri News)जवळून तारामंडल अनुभवता आले.
ग्रह, तारे, चंद्र यांचा मुलांना अनुभव जवळून घेता यावा म्हणून पिंपरी-चिंचवड माहापालिकेने सायन्सपार्क येथे तारामंडल शो तयार केला आहे. कोकणातील गुहाघर येथील दुर्गम भागातून शाळेच्या मुलांची सहल सायन्सपार्कला भेट देण्यासाठी आली होती. मुलांनी सायन्सपार्कची तशी सफर केली पण त्यांना सायन्सपार्कचा तारामंडल शो बघायचा होता.
त्यासाठी त्यांना तिकीट काढावे लागणार होते. पण मुले गरीब असल्याने त्यांना ते शक्य नव्हते. त्यांची ही चर्चा सुरु असताना पिंपरी-चिंचवडचे नागरिक असणारे अमोल मोरे यांनी त्यांचे संभाषण ऐकले, चौकशी केली तर मुलांना शो पहायचा आहे पण पैसे नाहीत ही बाब त्यांच्या लक्षात आली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता 40 मुलांचे 1 हजार 320 रुपयांचे मुलांचे तिकीट काढले व मुलांना तारांगण मोकळे केले.
सायन्सपार्कच्या कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनीही मोरे यांचा छोटेखाली सत्कार करत आभार मानले. कारण तिकीटाची रक्कम किरकोळ असीली तरी त्या मुलांच्या डोळ्यातली स्वप्ने मोठी होती. त्यांच्याकडे अगदी हजार रुपये ही नसल्याने ती मुले हाताश होऊन जाणार होती. मात्र मोरे यांच्यामुळे तेच हाताश डोळे स्वप्न, आनंद, गोड आठवण असं बरच काही घेऊन गेली.
याविषयी मोरे यांनी भावना व्यक्त करताना म्हटले की, एक सामाजीक जाणीव म्हणून मी हे काम केले. ग्रामीण भागातील प्रत्येक मुलाला याचा लाभ घेता आला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. मोरे सारखा प्रत्येकाने विचार केला तर सर्वांनाच शिकण्याची समान संधी मिळेल तसेच समाजात (Pimpri News) अजूनही सकारात्मक व चांगली माणसे आहेत या गोष्टीवर विश्वास अजून पक्का होत जातो.