Pimpri Water Supply News : ‘वॉल्व’ दुरुस्तीच्या कामामुळे आज संध्याकाळचा, मंगळवारी सकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार

एमपीसी न्यूज – रावेत येथील अशुध्द जलउपसा केंद्रातील फुटलेल्या ‘वॉल्व’च्या दुरुस्तीला काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे आज (सोमवारी) संध्याकाळचा आणि उद्या (मंगळवारी) सकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे महापालिकेचे सहशहर अभियंता प्रवीण लडकत यांनी सांगितले. दरम्यान  वॉल्व फुटण्याची ही पहिलीच घटना आहे.

महापालिकेचे रावेत येथील अशुध्द जलउपसा केंद्रात अचानक ‘वॉल्व’ नादुरस्त झाल्याने विद्युत पंप आणि उपकरणांमध्ये बिघाड झाला आहे. हे पंप आणि उपकरणे दुरुस्त करण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. या बिघाडामुळे भोसरी आणि चिंचवड मुख्य जलवाहिनी बंद राहणार आहे.

त्यामुळे आज संध्याकाळचा आणि मंगळवारी सकाळचा भोसरी, दिघी, बोपखेल, चऱ्होली, मोशी, बोऱ्हाडेवाडी, इंद्रायणीनगर, चिंचवड, पिंपरीगाव, पिंपळे सौदागर, पिंपळेगुरव, दापोडी, सांगवी इत्यादी भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.