Pimpri News : ई-वेस्ट ही समस्या नसून त्याच्या पुर्नवापराकडे संधी म्हणून पाहा – आयुक्त सिंह

एमपीसी न्यूज – आधुनिकीकरणामुळे ई-वेस्टच्या प्रमाणात (Pimpri News) मोठी वाढ झाली आहे. आपल्या अवतीभवती निर्माण होणा-या कच-यामुळे अनेक समस्या निर्माण होवू पाहत आहे. ई-वेस्ट ही समस्या नसून त्याच्या पुर्नवापराद्वारे निर्माण होणा-या संधींकडे पाहा, असे आवाहन महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी केले.

चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे पिंपरी-चिंचवड महापालिका, ऑस्टो क्लस्टर, पुणे नॉव्हेज क्लस्टर व ईसीए यांच्या संयुक्त् विद्यमाने पर्यावरण नवकल्पना आणि सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. वैज्ञानिक दृष्टीकोण ठेवून कच-याचा पुनर्वापर करणाऱ्या पर्यावरण प्रेमी व समाजात पर्यावरण जनजागृतीसाठी कार्यरत राहणा-या व्यक्तींचा आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शहर स्वच्छतेसाठी महापालिका मार्फत राबविण्यात येणा-या उपक्रमांची माहिती देतांना ते बोलत होते.

तसेच, कचरा दान करण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त (Pimpri News) अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, ऑटो क्लस्टरचे मॅनेजिंग डायरेक्टर किरण वैद्य, ईसीएच्या अध्यक्षा विनिता दाते, इसीएच्या नताशा गांगल, हिरामण भुजबळ, अनिता काने यांच्यासह इंदिरा कॉलेज ताथवडे, इंजीनियरिंग कॉलेज पुणे, पीसीसीओई कॉलेज, आयआयईबीएम कॉलेज वाकड, एआयएसएसएमएस कॉलेजचे विद्यार्थी तसेच पर्यावरण प्रेमी उपस्थित होते.

आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, कचरा निमुर्लनासाठी महापालिकेच्या वतीने अनेक उपक्रम राबविले जात आहेत. नदी स्वच्छता व पर्यावरण स्वच्छतेसाठी नदी सुधार प्रकल्प आखण्यात आला आहे. नदी काठी व मोकळया जागांमध्ये राडारोडा न टाकण्याचे आवाहन देखील करण्यात येते. शहर स्वच्छतेसाठी केंद्र शासनाचा ‘अर्बन आउटकम्स फ्रेमवर्क 2022’ हा उपक्रम 9 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर 2022 या दरम्यान राबविण्यात येत आहे. त्यामध्ये शहरातील नागरिक, विद्यार्थी, सामाजिक संस्था, गृहनिर्माण संस्था, शाळा, महाविद्यालये आणि विविध आस्थापना यांचा सहभाग वाढवून जनजागृती मोहिम हाती घेण्यात आली आहे. सिटीझन परसेप्शन सर्वेक्षणद्वारे नागरिकांचा अभिप्राय नोंदविण्यात येत आहे. या मोहिमेत पर्यावरण प्रेमींनी शहर प्रथम क्रमांकाचे बनविण्यासाठी सहभाग नोंदवावा, असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.

लिंबाजी ससाणे (जुन्या साड्यांपासून दोर बनवणे), मेधा ताडपत्रीकर (प्लास्टिक कचऱ्यापासून इंधन बनवणे), अमिता देशपांडे (प्लास्टिक कचऱ्यापासून बास्केट बनवणे), निर्वाण सोमानी, शिवानी सोमानी (दिल्ली) (जुन्या जीन्स पासून झोपेची पिशवी बनवणे) तर मनीष कोठारी चिंचवड (प्लास्टिक कचऱ्यापासून विटा बनवणे) यांनी जून्या कपडयांच्या पुनर्वापराबाबत व्हिडीओ चित्रफीतीद्वारे माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.