_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pimpri News : ब्रेनडेड तरुणाच्या अवयदानामुळे आठ रुग्णांना नवजीवन

0

एमपीसी न्यूज – मेंदूमध्ये रक्तस्त्राव झालेल्या पुरुषाला डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्रामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी उपचारांदरम्यान त्यांना मेंदू मृत (ब्रेन डेड) घोषित करण्यात आले होते. कुटुंबावर कोसळलेल्या दुःखाचा आघात बाजूला सारून ब्रेन डेड रुग्णाची पत्नी व कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. या धाडसी निर्णयामुळे आठ जणांना नवजीवन मिळाले .

मानवी प्रत्यारोपण कायद्यातील तरतुदी नुसार रुग्णाच्या कुटुंबियांना अवयवदानाविषयी रुग्णालयातील अवयवदान व प्रत्यारोपण विभागाच्या समन्वयक यांनी समुपदेशन केले. तसेच रुग्णाच्या नातेवाईकांच्या सर्व शंकांचे निरसन करण्यात आले.

विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीच्या नियमानुसार व प्रतीक्षा यादीप्रमाणे यकृत, दोन नेत्रपटल, दोन मूत्रपिंड, हृदय, फुप्फुस, छोटे आतडे हे अवयव गरजू रुग्णापर्यंत पोचविण्यात आले. यामध्ये दोन मूत्रपिंड, यकृत, दोन नेत्रपटल डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयात तर बाकीच्या अवयवांमध्ये हृदय आणि फुप्फुस हे मुंबई, तर छोटे आतडे या अवयवाचे पुण्यातील रुग्णालयातील रुग्णांना प्रत्यारोपण करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

अवयवदात्याच्या नातेवाईकांचा निर्णय तसेच रुग्णालयातील डॉक्टरांच्या व कर्मचाऱ्यांच्या वेगवान कृतीमुळे या इतर रुग्णांना नवे जीवन मिळण्यास मदत झाली. जीवनदान देण्याची किमया डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या डॉक्टरांनी साधली.

“आज आमचा करता धरता आधारवड हरपला आहे. मात्र, जीवनाच्याअंती गरजवंत आठ व्यक्तींना नव जीवन दिले हे फार महान कार्य आज घडले” या भावना नातेवाईकांनी व्यक्त केल्या. ते पुढे म्हणाले, “त्यांना पहिल्यापासूनच समाजकार्याची आवड होती. सामाजिक कार्यात निस्वार्थ भाव व सामाजिक बांधिलकी त्यांनी कायमच जपली. आजही त्याचे जीवन इतरांसाठी वरदान ठरले”. अवयवदान करणाऱ्या 33 वर्षीय रुग्णाच्या पाश्चत पत्नी, दोन मुले, वडील, पाच बहिणी असा परिवार आहे.

डॉ. डी. वाय पाटील रुग्णायालयात करण्यात आलेल्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी मूत्रपिंड तज्ज्ञ डॉ. तुषार दिघे, यकृत विकार तज्ज्ञ डॉ. बिपीन विभुते, मज्जसंस्था शल्यचिकित्सक डॉ. दीपक रानडे, भूलतज्ज्ञविभाग प्रमुख डॉ. स्मिता जोशी यांचा सहभाग होता. डॉ. एच. एच. चव्हाण व डॉ. जे. एस. भवाळकर यांचे या प्रक्रियेत योगदान लाभले.

यकृत प्रत्यारोपणात 51 वर्षीय पुरुष तर दोन मूत्रपिंड प्रत्यारोपणात 28 वर्षीय तरुण व 60 वर्षीय रुग्णाचा समावेश होता. नेत्रपटल प्रतीक्षा यादी प्रमाणे प्रत्यारोपित करण्यात येईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment