Pimpri News : नेहरूनगर येथील जम्बो कोविड केअर सेंटर मधील इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरला आग

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नेहरुनगर, पिंपरी येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये शाॅर्टसर्कीट होऊन ट्रान्सफार्मरला आग लागली. ही घटना आज (सोमवारी, दि. 4) रात्री पावणे आठ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे वीजपुरवठा खंडीत झाला. मात्र आग वेळीच विझल्याने अनर्थ टळला.

_MPC_DIR_MPU_II

मिळालेल्या माहितीनुसार, जम्बो कोविड सेंटरमधील आयसीयू कक्षाला लागून मागच्या बाजूला वीज ट्रान्सफार्मर आहेत. यातील एका ट्रान्सफार्मरला शाॅर्टसर्किटमुळे आग लागली. वीजपुरवठा खंडीत झाल्याने ही बाब लागलीच निदर्शनास आली.

याबाबत महापालिकेच्या अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली. त्यानंतर अग्निशामक दलाचा बंब दाखल झाला. जवानांनी तात्काळ आग विझवली. त्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. या घटनेत कोणत्याही प्रकारचे मोठे नुकसान झाले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like