Pimpri news: ‘ऑनलाईन परीक्षेतील त्रुटी दूर करा; अन्यथा राजभवनासमोर धरणे आंदोलन’

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे राज्यपालांना पत्र

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या धोक्याकडे सपशेल दुर्लक्ष करत महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा चालू आहेत. मात्र, या परीक्षेत प्रचंड प्रमाणात गोंधळ उडाला असून विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने विद्यापीठानुसार परीक्षा पध्दतीतील त्रुटी व विद्यार्थ्यांना आलेल्या अडचणी तत्काळ दूर कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी राज्यपालांकडे केली आहे. यामध्ये वेळीच लक्ष घालावे; अन्यथा राज्यभर तसेच राजभवनासमोर धरणे आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्रामध्ये महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सुरु आहेत. मात्र, या परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रात सुरु असताना विद्यार्थ्यांना असंख्य प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे.या अनुषंगाने विद्यार्थ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

नियोजनशुन्यता, मॉक टेस्टचा अभाव, कुशल मनुष्यबळाचा अभाव, अपात्रताधारक सर्विस प्रोव्हायडर, हेल्पलाईन केंद्राची अकार्यक्षमता व प्रशासकीय दिरंगाई, MCQ प्रश्नांची प्रश्नपेढी(QYUESTIONBANK) न पुरवणे यामुळे विद्यार्थी त्रस्त आहेत.

ऑनलाईन परिक्षेत प्रश्न कसे असतील याची माहिती नसल्याने विद्यार्थ्यांना ताण येत आहे. डिव्हाईसचा व कनेक्टिव्हीटीचा अभाव व त्यावर मात केली की ऑनलाईन पेपरचे लॉगइन होत नाही. लॉगइन झाले की पेपर येत नाही आणि पेपर आलाच तर तो सबमिट होत नाही, असे एक ना अनेक समस्या विद्यार्थ्यांना येत आहे.

अनेक विद्यापीठात एकाच दिवशी एकाच वेळी अनेक शाखांचे पेपर घेतले जात आहेत. त्यामुळे ऑनलाईन यंत्रणेवर ताण येऊन यंत्रणा निकामी ठरत आहे. विद्यार्थ्यांचे हेल्पलाईन नंबरवर आलेले फोन सुध्दा उचलले जात नसल्याचे पुढे येत आहे. एकाच दिवशी एकाच वेळी सर्व शाखांचे पेपर न घेता शाखानिहाय वेगवेगळ्या परिक्षा व्हायला हव्या होत्या.त्यामुळे सर्व्हरवर ताण आला नसता.

बहुतेक विद्यापीठात अपात्रताधारक सर्विस प्रोवाईडर नेमल्याने मोठी अडचण निर्माण झालेली आहे. आपल्याला तिकडेही डोळसपणे पाहावे लागेल. या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी विद्यापीठ प्रशासन सक्षम आहे असे वाटत नाही. विद्यापीठाच्या या नियोजनशून्य कारभाराचा व ढिसाळपणाचा जाहीर निषेध करतो.

या पुढील सर्व परीक्षा एकतर होम असाईनमेंट(HOME ASSIGNMENT) पद्धतीने व्हाव्यात किंवा परीक्षा पद्धतीतील सर्व अडचणी पूर्णपणे दूर करून मग त्या घेतल्या जाव्यात. या संदर्भात आपण पुढाकार घेऊन महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांना आपण तसे आदेश द्यावेत.

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मानसिक त्रासातून मुक्त करावे. यापुढेही परीक्षा अश्याच पध्दतीने सुरू राहिल्यास सर्व विद्यापीठ वराजभवनासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनातून दिला आहे.

या सर्व नियोजनशून्य व ढिसाळ कारभाराचा निषेध म्हणून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील कुलगुरू यांना सोमवारी निषेध पत्र देऊन निषेध आंदोलन करणार आहे.

यापुढेही परीक्षांच्या बाबतीत अशीच परिस्थिती राहिल्यास राजभवन आणि सर्व विद्यापीठात धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.