Pimpri News: वेतनासाठी जम्बो कोविड केअर सेंटरमधील कर्मचाऱ्यांचे आंदोलन

एमपीसी न्यूज – नेहरुनगर येथील जम्बो कोविड केअर सेंटरमधील ( Jumbo Covid care Center) काम करणा-या कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार (Payment)  मिळाला नाही. तसेच सहा महिन्यांचे काम सांगून चार महिनेच काम दिल्याचा आरोप करत कर्मचा-यांनी आज (सोमवारी) राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाच्या विरोधात आंदोलन (Agitation) केले.

पीएमआरडीए ( PMRDA) , जिल्हा प्रशासन ( District Adminastration) व महापालिकेच्या वतीने नेहरुनगर येथे जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. याठिकाणी राज्यभरातील कोरोनाबाधित रुग्णांवर ( उपचार ( Corona patients Treatment)  करण्यात आले. ऑगस्ट महिन्यांपासून कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येते होते.

याठिकाणी स्वच्छतेचे काम करण्यासाठी सुमारे सातशे कर्मचाऱ्यांना कामावर घेतले. कामावर घेत असताना या कर्मचाऱ्यांना सहा महिन्याची वर्क ऑर्डर ( Work Order) दिली. मात्र, प्रत्यक्षात चार महिन्यातच कर्मचाऱ्यांना काम बंद करण्याच्या सूचना रुग्णालय प्रशासनाने दिल्या.

तसेच ज्यावेळी या कर्मचाऱ्यांना कामावर घेतले त्यावेळी त्यांना 15 ते 16 हजार रुपये पगार देण्याचे आश्‍वासन देण्यात आले.

मात्र, प्रत्यक्षात त्यांच्या बँक खात्यामध्ये 12 हजार रुपये पागर जमा करण्यात आला. त्यासोबतच शासनाकडून पीएफ व इतर सुविधांचाही लाभ देण्यात आला नाही. त्यामुळे स्थानिक प्रशासन व राज्य सरकार विरोधात कर्मचाऱ्यांनी रुग्णालयातच आंदोलन केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.