Pimpri News : डी. वाय. पाटील रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

एमपीसीन्यूज : शासन नियमानुसार कोविड भत्ता मिळावा, कोविड काळात सुरक्षितता मिळावी, यासह अन्य मागण्यांसाठी पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातील महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आजपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरु राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, आंदोलक डी वाय पाटील रुग्णालय व्यवस्थापनाच्या वरिष्ठांसोबत चर्चा करण्यासाठी तयार आहेत. मात्र, अद्याप रुग्णालय व्यवस्थापनाकडून कोणीही चर्चेसाठी आले नसल्याची माहिती मिळत आहे. कोरोनाच्या संकटात महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु केल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना योजनेची कागदपत्रे सादर करण्यासाठी गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, डी. वाय. पाटील रुग्णालय व्यवस्थापनासोबत आंदोलकांची सकारात्मक चर्चा झाली. व्यवस्थापनाकडून आमच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्याने आम्ही आंदोलन स्थगित केल्याची माहिती आंदोलकांच्या वतीने देण्यात आली.

या संदर्भात रुग्णालय अधीक्षक हनुमंत चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. त्यांची प्रतिक्रिया मिळाल्यास ती या बातमीत समाविष्ट करण्यात येईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.