Pimpri News : निरामय जीवन शैलीसाठी पर्यावरण रक्षण आवश्यक : सचिन साठे

जागतिक पर्यावरणदिनानिमित्त वृक्ष लागवड, सामाजिक संस्थेला अन्नदान

एमपीसीन्यूज : मानवाच्या निरामय जीवन शैलीसाठी पर्यावरण रक्षण आवश्यक आहे. पर्यावरणाचा संबंध थेट मानवी जीवनाशी आहे. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आधुनिकतेच्या नावाखाली मानवाकडून वसुंधरेचा -हास होत आहे. वृक्ष लागवड करुन आणि त्यांचे जतन, संवर्धन करुन आपण काही अशी वसुंधरेचे रक्षण करु शकतो. यासाठी सरकार बरोबरच सामाजिक संस्था, औद्योगिक आस्थापनांसह सामाजिक कार्यकर्त्यांनीही खारीचा वाटा उचलला पाहिजे असे प्रतिपादन कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केले.

जागतिक पर्यावरणदिनानिमित्त पिंपरी चिंचवड कॉंग्रेसचे शहराध्यक्ष साठे यांच्या हस्ते यमुनानगर येथील धर्मवीर संभाजी महाराज क्रिडा संकुल येथे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच पिंपरीतील रियल लाईफ रियल पीपल या संस्थेच्या सावली निवारा केंद्रात किराणा साहित्य देण्यात आले.

यावेळी माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, कॉंग्रेसचे पर्यावरण विभाग महाराष्ट्र सरचिटणीस अमर नाणेकर, महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, महिला कॉंग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा शामला सोनवणे, रियल लाईफ रियल पीपलचे संचालक एम. ए. हुसेन, प्रदेश अल्पसंख्यांक पदाधिकारी राजेंद्रसिंह वालिया, ब्लॉक अध्यक्ष विष्णूपंत नेवाळे, बाळासाहेब साळुंके, परशूराम गुंजाळ, युवक प्रदेश सरचिटणीस मयूर जयस्वाल, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, सज्जी वर्की, लक्ष्मण रुपनर, भाऊसाहेब मुगूटमल, गौरव चौधरी तसेच चंद्रशेखर जाधव, मकरध्वज यादव, संदेश बोर्डे, हिरामण खवळे, विशाल कसबे, बाबा बनसोडे, वसिम शेख, जिफीन जॉन्सन, शैलेश अनंतराव, कुंदन कसबे, शारदा मुंडे, सुभाष भुषणे, विश्वनाथ खंडाळे आदी उपस्थित होते.

सचिन साठे पुढे म्हणाले की, आज जगभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतोय. वसुंधरेची चिंता असलेले, त्याची काळजी घेणारे अनेक पर्यावरणवादी घटक, संघटना, पर्यावरण प्रेमींकडून आजचा दिवस हा उत्साहाने साजरा केला जातोय. विकासाच्या नावाखाली अमाप वृक्षतोड करुन जंगले उध्दवस्त केली जात आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस जागतिक तापमानात वाढ होऊन प्रदुषणाची समस्या वाढत आहे.

स्वागत एम. ए. हुसेन, सुत्रसंचालन मयूर जयस्वाल यांनी तर आभार चंद्रशेखर जाधव यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.