Pimpri News: शहरात कोरोना लसीकरणासाठी 50 केंद्रांची स्थापना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाच्या लसीकरणाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या शहरातील 17 ठिकाणी लस देण्यात येते. आता लसीकरणासाठी 50 केंद्र तयार करण्यात येणार आहेत. या केंद्राच्या माध्यमातून दिवसाला 8 तेे 9 हजार नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.

शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. गेल्या पंधरा दिवसांची आकडेवारी पाहिली असता रुग्णसंख्याचे आकडे वाढत आहे. त्यामुळे सध्या तपासण्या आणि लसीकरण यावर भर द्यावा लागणार आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या माध्यमातून आढळलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे 20 ते 40 या वयोगटातील आहेत.

सध्या महापालिकेच्या 17 ठिकाणी लसीकरण सुरू आहे. लसीकरण वाढवण्यासाठी महापालिका 50 नवीन केंद्रांची सुरुवात करणार आहे. या केंद्रांमधून दिवसाला किमान आठ ते नऊ हजार रुग्णांना लस देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.

पिंपरी-चिंचवडमध्ये 117 ठिकाणी कंटेनमेंट झोन तयार करण्यात आले आहेत. चिंचवड, पिंपरी, निगडी भोसरी, वाकड, काळेवाडी हे कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहे. त्यामुळे कोविड प्रतिबंध करायचा असेल. तर, लसीकरण करणे सध्या प्राधान्याने गरजेचे आहे. आपल्याकडे 1 लाख 2 हजार डोस सध्या उपलब्ध आहे.

कोरोना प्रतिबंध उपाययोजनांमध्ये महापालिकेने जिजामाता आणि भोसरी येथील हॉस्पिटलमध्ये आयसीयु सुरू केले जाणार आहे. पंचवीस बेड क्षमतेचे हे आयसीयु असणार असून यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली आहेे, असल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.