Pimpri News : ‘काळेवाडी रेसिडेन्स वेलफेअर असोसिएशन’ची स्थापना

एमपीसी न्यूज: काळेवाडी परिसरातील वाढत्या समस्या बघता काही सजग नागरिकांनी एकत्र येऊन ‘काळेवाडी रेसिडेन्स वेलफेअर असोसिएशन’ची स्थापना केली आहे.

काळेवाडी परिसर स्वच्छ, सुंदर, गुन्हेगारीमुक्त ठेवणे, दैनंदिन जीवनातील समस्या त्वरित संबंधित लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिका-यांकडे मांडणे व योग्य पद्धतीने त्या सोडविणे तसेच पर्यावरणपूरक कार्यक्रम राबवणे, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आयोजित करणे, महापालिकेच्या सारथी योजनेचा प्रसार, प्रचार करणे हा असोशिएशनचा मुख्य उद्देश आहे.

असोसिएशनच्या मुख्य समितीमध्ये प्रमोद हाटे (अध्यक्ष), सुरेश पाटील (उपाध्यक्ष), श्री. भोई, प्रवीण अहिर (खजिनदार), सुनंदा काळे, आशा इंगळे, ज्योती शिंदे (सदस्या) यांची निवड करण्यात आली आहे.

अवेळी होणारा पालिकेचा पाणी पुरवठा, सांडपाण्याचा प्रश्न, नदीची झालेली दुरवस्था, पर्यावरण, बेरोजगारी, रस्त्यावरून जाणा-या टारगट मुलांचा त्रास, यांसारख्या नागरिकांच्या रोजच्या जीवनातील समस्या सोडविण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.

तसेच संघटनेच्यावतीने 26 जानेवारी 2021 रोजी पहिली ते सातवीतील मुलांसाठी काळेवाडीत पहिली खुली चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

यासाठी कोणतीही फी आकारण्यात येणार नाही. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 23 जानेवारीपर्यंत 9822518684 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.