Pimpri News : भाजप खासदारांचे ऐकून तरी पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणा – गजानन बाबर

एमपीसी न्यूज – पेट्रोल व डिझेल दरवाढीचा देशातील सर्वसामान्य जनतेला फटका बसत आहे. दरवाढ करताना सर्वसामान्य जनतेला डोळ्यासमोर ठेवावे. देशातील महागाईस सर्वस्वी मोदी सरकारच जबाबदार असल्याचा आरोप करीत मावळचे माजी खासदार गजानन बाबर यांनी केला आहे. तसेच किमान भाजप खासदारांचे ऐकून तरी पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणा, अशी मागणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

याबाबत बाबर यांनी पंतप्रधान मोदी यांना पाठविलेल्या निवेदनातम्हटले आहे की जगात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या असताना देखील देशातील पेट्रोल व डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत.

_MPC_DIR_MPU_II

सर्वसामान्य जनतेला ही दरवाढ असह्य होत आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात देखील पेट्रोलचा दर 60 रुपये लिटरच्यावर कधी गेला नाही. खनिज तेलाच्या किमती कमी असताना देखील पेट्रोलचे दर वाढत आहेत त्यामुळे ही खूप गंभीर बाब आहे.

पेट्रोल व डिझेल दरवाढीमुळे शेतकरी, व्यापारी, उद्योजक अशा सर्वच स्तरातील जनतेचं कमबरंडे मोडलं आहे. इंधन दरवाढीचा दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत आहे. सरकारने याचा सारासार विचार करून पेट्रोल व डिझेल जीएसटीच्या कक्षात आणावे, अशी विनंती बाबर यांनी निवेदनात केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.