Pimpri News : पोलिसांची अशीही तत्परता, गाडीवरून पत्ता शोधून काढून वयस्कर इसमाला घरी सुखरूप पोहचवले

एमपीसी न्यूज –  आज सकाळी- सकाळी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एक सकारात्मक बातमी त्यांच्या ट्वीटर अकांऊटवरून नागरिकांना कळवली. पोलिसांनी काही तरी सकारात्मक (Pimpri News) सांगितले त्याचे नागरिकांनी ही तोंडभरून कौतुक केले.कारणही तसेच होते.

एक वयोवृद्ध इसम अपघातग्रस्त झाला त्याला पत्ता ही निटसा आठवत नव्हता पण हिंजवडी पोलिसांनी त्याच्यावर उपचार करत केवळ गाडी क्रमांकावरून त्याचा पत्ता शोधून त्याला घरी सुखरूप पोहचवले आहे.

हा सारा प्रकार रविवारी (दि.29) मध्यरात्री घडत होता.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाळुंगे मार्शल हे गस्त घालत असताना पोलिसांना कॉल आला की एक वयस्कर व्यक्ती दुचाकीवरून घसरून पडली आहे. त्यानुसार हिंजवडी पोलीस  हे तातडीने घटनास्थळी पोहचले व त्यांनी वयस्क इसमाला मदत केली. त्यांना नाव पत्ता विचारला तर त्यांना तो सांगता येत नव्हता. यावेळी पोलिसांनी दुचाकीच्या क्रमांकावरून पत्ता शोधण्यास सुरुवात केली.

Nigdi News : शिवसेनाप्रमुखांनी शिवसैनिकांना आक्रमकतेचे बाळकडू पाजले – नंदकुमार सातुर्डेकर

 

यावेळी रावेत पोलीस ठाण्यात संबंधीत इसमाची मिसींग दाखल असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिसांनी रावेत पोलिसांशी संपर्क साधला.तेथे संबंधीत नागरिकाचे नाव हे  फिलिप्स सोलोणी असल्याचे समजले. तेथून सोलोणी यांच्या पीसीपीसी कॉलेज शेजारी आकुर्डी येथे राहणाऱ्या मुलीशी संपर्क करून रात्री (Pimpri News) दोन वाजता त्यांना सुखरुप कुटुंबीयांकडे देण्य़ात आले.

हि कारवाई पोलीस सहायक फौजदार राजे भोसले, रासकर, हेड कॉन्स्टेबल बेबले, शिंदे व पोलीस कॉन्स्टेबल बजंत्री यांनी केली आहे.पोलिसांनी या घटनेची ट्विटरद्वारे माहिती देताच नागरिकांनीही हिंजवडी पोलिसांचे कौतुक केले,  पोलिसांनी अशा घटना समोर आणल्या तर पोलीस व नागरिक यांच्यातील सुसंवाद वाढण्यास नक्कीच मदत होईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.