Pimpri News : हाथरस प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा द्या – आप 

एमपीसी न्यूज – हाथरस प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयात करावी आणि दोषींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी आम आदमी पार्टी अल्पसंख्यांक विंग व महिला विंगच्या वतीने करण्यात आली. पिंपरी येथील आंबेडकर चौक याठिकाणी त्यांनी हाथरस प्रकरणाचा निषेध करत प्रदर्शन केले. 

उत्तर प्रदेश मधील हाथरस याठिकाणी घडलेली घटना अमानवीय आहे. उत्तर प्रदेश सरकार व पोलीस ज्यापद्धतीची वागणूक देत आहेत ती चुकीची असून योगी आदित्यनाथ यांचे सरकार बरखास्त करून त्याठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी करत हाथरस प्रकरणी व उत्तर प्रदेश सरकारचा निषेध करत आदमी पार्टी अल्पसंख्यांक विंग व महिला विंगच्या वतीने निषेध प्रदर्शन करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

हाथरस प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयात करावी आणि दोषींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी आम आदमी पार्टी अल्पसंख्यांक विंग व महिला विंगच्या वतीने करण्यात आली.

यावेळी आम आदमी पार्टी अल्पसंख्यांक विंग चे अध्यक्ष यशवंत कांबळे, वहाब शेख , महिला विंगच्या अध्यक्ष स्मिता पवार, स्वप्नील जेवळे , सागर सोनवणे, सरफराज मुल्ला, पूजा दास, नंदू नारंग, तेजस्विनी, सुशील अजमेर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.