Pimpri News: विठ्ठलनगर एसआरए प्रकल्पातील इमारतीच्या दुरूस्तीसाठी 1 कोटी 13 लाखाचा खर्च

एमपीसी न्यूज – शहर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत नेहरूनगर – विठ्ठलनगर येथील प्रकल्पातील इमारतीचे स्थापत्य, विद्युत, पाणीपुरवठा व जलनि:सारण विषयक कामांची दुरूस्तीची कामे करण्यात येणार आहेत. या कामासाठी 1 कोटी 65 लाख 93 हजार रूपये दर निश्चित करण्यात आला आहे.

रॉयल्टी आणि मटेरियल टेस्टींग चार्जेस वगळून 1 कोटी 65 लाख 68 हजार रूपयावर निविदा मागविण्यात आल्या. चार ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यापैकी प्रेरणा क्रिएटर्स या ठेकेदाराने निविदा दरापेक्षा 32.1 टक्के कमी म्हणजेच 1 कोटी 12 लाख रूपये अधिक रॉयल्टी चार्जेस 9 हजार 244 रूपये आणि मटेरियल टेस्टींग चार्जेस 25 हजार 250 रूपये असा एकूण 1 कोटी 12 लाख 99 हजार रूपये दर सादर केला.

त्यामुळे प्रेरणा क्रिएटर्स यांची निविदा स्वीकृत करण्यास महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 30 सप्टेंबर रोजी मान्यता दिली आहे. त्यानुसार, त्यांच्यासमवेत करारनामा करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.