Pimpri News : फर्निचर, वैद्यकीय साहित्य तपासणीसाठी 20 लाखांचा खर्च

एमपीसी न्यूज – नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलातील जम्बो कोरोना रूग्णालयातील वैद्यकीय साहित्य, फर्निचर पुन्हा खुले करून देण्यासाठी 20 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

पहिल्या टप्प्यातील कोरोना प्रादूर्भाव कमी झाल्यानंतर नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलातील जम्बो कोरोना रूग्णालय बंद करण्यात आले होते. त्यामुळे या कोरोना रूगणालयातील सर्व वैद्यकीय साहित्य, फर्निचर पॅकींग करून ठेवण्यात आले होते.

मात्र, फेब्रुवारीच्या दुस-या आठवड्यात शहरात कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने पॅकींग करून ठेवलेले वैद्यकीय साहित्य, फर्निचर पुन्हा खुले करून देण्यासाठी चित्रा सेल्स अ‍ॅण्ड सर्व्हीसेस यांना आदेश देण्यात आले आहेत.

वैद्यकीय साहित्य, फर्निचर पुन्हा खुले करून बसवून देण्यासाठी 5 लाख 90 हजार रूपये तसेच तीन कर्मचारी, एक सुपरवायझर 24 तास शिफ्टमध्ये कार्यरत राहून त्यांच्याकडून सर्व वैद्यकीय साहित्याची रोज तपासणी करण्यासाठी दोन महिन्यांकरिता 14 लाख 16 हजार रूपये दर ठरविण्यात आला.

त्यानुसार, चित्रा सेल्स अ‍ॅण्ड सर्व्हीसेस यांना जम्बो कोरोना रूग्णालयातील 800 बेडसाठी एकूण 20 लाख 6 हजार रूपये देण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.