Pimpri News: स्थायी समितीचा धमाका, विशेष सभेत साधला 280 कोटींचा ‘शहर विकास’

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीतील सदस्यांची 28 फेब्रुवारीला मुदत संपत आहे. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्षांनी आज (सोमवारी) विशेष सभा घेत धमाका केला. रस्ते विकासांसह तब्बल 280 कोटी रुपयांच्या विकासकामांना मान्यता दिली.

वाकड येथील नव्याने ताब्यात आलेल्या रस्ते विकसित करण्याकामी 42 लाख रुपये, पठारे मळा, बुर्डे वस्ती, काळजेवाडी परिसर आणि च-होली परिसरात स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी 95 लाख, रहाटणी परिसरातील रस्त्यांवरील दिवाबत्ती पोल बदलण्यासाठी 92 लाख, चापेकर चौक ते मोरे हॉस्पिटलपर्यंतचा रस्ता अर्बन डिझाईन नुसार विकसित करण्यात येणार असून यासाठी 5 कोटी 82 लाख,

भोसरी स्मशानभूमी ते अग्निशामक केंद्रापर्यंतचा रस्ता तसेच भोसरीमधील बापूजीबुवा चौक ते पीएमटी चौकापर्यंतचा रस्ता आणि प्रभाग क्र. 8 मधील यशवंतराव चव्हाण चौक ते विश्वश्वेर चौकापर्यंतचा रस्ता अद्यावत करण्यात येणार आहे. यासाठी 77 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

संभाजीनगर, शाहूनगर आणि इतर परिसरात जलनिःसारण विषयक सुधारणाकामे आणि नलिका टाकण्यासाठी 35 लाख रुपये, ‘अ’, ‘ब’, ‘इ’ आणि ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत जलनिःसारण नलिकांविषयक कामांसाठी 3 कोटी 68 रुपये खर्च केले जाणार आहेत. सेक्टर 23 येथील जलशुद्धीकरण विषयक कामांसाठी 90 लाख रुपये खर्च होणार आहेत.

बिर्ला हॉस्पिटल पासून वाल्हेकरवाडी पर्यंतचा रस्ता, दोन्ही बाजूंनी पदपथ तसेच सायकल ट्रॅक करण्यासाठी 20 कोटी 55 लाख रुपये, भोसरीतील चांदणी चौक ते लांडेवाडी महाराष्ट्र बँकेपर्यंतचा रस्ता अद्ययावत पद्धतीने विकसित करण्यासाठी 35 कोटी 97 लाख रुपये खर्च केले जातील.

प्रभाग क्रमांक 8 मधील संकेत हॉटेल ते मराठा चेंबर्स पर्यंतचा रस्ता अद्ययावत पद्धतीने विकसित करण्यासाठी 27 कोटी 62 लाख रुपये खर्च होणार आहेत. अशा विविध 280 कोटी 18 लाख 44 हजार 299 रुपयांच्या विकासकांना स्थायी समितीने मान्यता दिली.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.