Pimpri News : ‘प्रधानमंत्री आवास योजनेचे अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ द्या’

स्वीकृत सदस्य दिनेश यादव, नगरसेवक कुंदन गायकवाड यांची मागणी

एमपीसीन्यूज : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अर्ज भरण्याची अंतिम मुदत 17 सप्टेंबर असलयाने यासाठी अवघे आठ दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र अद्यापही शहरातील हजारो नागरिकांनी विविध कारणास्तव अद्यापही अर्ज भरलेला नाही. त्यामुळे महापालिकेने अर्ज भरण्याची मुदत वाढवावी, अशी मागणी स्वीकृत सदस्य दिनेश यादव, नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी महापौर उषा ढोरे यांच्याकडे केली आहे.

याबाबत महापौर ढोरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात मोजक्याच ठिकाणी नागरी सुविधा केंद्र आहेत. या केंद्रांवर अर्ज भरण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत आहेत.

मात्र, सततच्या तांत्रिक अडचणी, कागदपत्रांची पूर्तता करण्यास लागणारा वेळ, अशा विविध अडचणींमुळे अर्ज भरण्यास विलंब होत आहे. परिणामी अद्यापही हजारो गरजू नागरिकांनी अर्ज भरलेला नाही.

त्यासाठी अर्ज भरण्याची मुदत वाढविण्याची मागणी यादव आणि गायकवाड आणि रामकृष्ण लांडगे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.