Pimpri News : पंतप्रधान आवास योजनेचा डीडी भरण्यास मुदतवाढ द्या – माकप

एमपीसी न्यूज – पंतप्रधान आवास योजनेचा डीमांड ड्राफ्ट (डीडी) भरण्यास 30 ऑक्टोंबर पर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. 
या मागणीचे निवेदन पिंपरी-चिंचवड आयुक्त श्रावण हर्डीकर, महापौर उषा ढोरे व सभागृह नेते नामदेव ढाके यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने ई-मेलद्वारे पाठवण्यात आले आहे.

या निवेदनात आवास योजनेसाठी डीडीची पाच हजार रुपये रक्कम भरण्यासाठी 30 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ द्यावी तसेच, डीडीची रक्कम एक हजार रुपये करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कोरोनामुळे नागरिकांवर आर्थिक संकट ओढवले आहे अशा परिस्थितीत डीडीची रक्कम रक्कम भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी केली आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर समितीच्या वतीने गणेश दराडे, अपर्णा दराडे, क्रांतिकुमार कडुलकर, सचिन देसाई, सतीश नायर, स्वप्नील जेवळे, अमीन शेख, अविनाश लाटकर यांच्या वतीने हे निवेदन इमेल करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.