Pimpri News : आवास योजनेचा स्वहिस्सा भरण्यासाठी मुदतवाढ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली येथे राबवण्यात येत असलेल्या घरकुल योजनेतील निवड झालेल्या लाभार्थ्यांना स्वहिस्सा रक्कम भरण्यासाठी 30 सप्टेंबर 21 मुदतवाढ देण्यात आली आहे.

महापौर उषा ढोरे व आयुक्त राजेश पाटील यांनी ही माहिती दिली. या मुदतीत स्वहिस्सा रक्कम न भरणा-या लाभार्थ्यांचा लाभ रद्द करण्यात येणार आहे. महापालिकेच्या वतीने या योजनेसाठी 2011 मध्ये संगणक सोडतीद्वारे प्रतिक्षा यादी जाहीर केली होती.

त्यामधील 456 लाभार्थ्यांना प्रथम स्वहीस्सा 50 हजार व 3 लाख 26  हजार रूपये भरण्यासाठी 30 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यामधील ज्या लाभार्थ्यांना स्वहिस्सा रक्कम भरता आली नाही, त्यांना 30 सप्टेंबरपर्यंत स्वहिस्सा भरण्याची मुदत देण्यात आली.

स्वहीस्सा रक्कम भरण्यासाठी पात्र असणा-या व संगणकीय सोडतीत निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर तसेच झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विेभागाच्या नोटीस बोर्डवर उपलब्ध करण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.