Pimpri news: पालिकेच्या कल्याणकारी योजनांच्या अर्ज स्वीकृतीस 24 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाच्या वतीने महिला व बालकल्याण, मागासवर्गीय, दिव्यांग कल्याणकारी व इतर विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. त्यासाठी अर्ज स्वीकृतीकरिता 25 नोव्हेंबरपर्यंत एक महिन्याची मुदत होती. त्याला आता 24 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती महापौर उषा ढोरे व सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी शुक्रवारी (दि.4) दिली.

लॉकडाऊनमुळे अनेकांना आवश्यक कागदपत्रे जमा करता आली नाहीत किंवा उपलब्ध झाली नाहीत. त्यामुळे कल्याणकारी योजनांच्या अर्ज स्वीकृतीस मुदतवाढ देण्याची मागणी नगरसेवकांसह पदाधिकार्‍यांनी केली होती. त्यामुळे अर्ज स्वीकृतीस 24 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

अर्ज वाटप आणि स्वीकृती शहरातील सर्व नागरी सुविधा केंद्रांमध्ये सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत सुरू आहे. अर्ज मोफत आहेत. अर्ज भरून दिल्यानंतर 20 रूपये शुल्क आहे. या योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन ढोरे व ढाके यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.