Pimpri news: महापालिकेच्या 36 व्यायामशाळा चालविण्यास मुदतवाढ; संस्थांना दरमहा दोन हजार रूपये सेवाशुल्क

एमपीसी न्यूज – खासगी संस्था, मंडळांमार्फत चालविल्या जाणा-या महापालिकेच्या 36 व्यायामशाळांना मुदतवाढ देण्यात येणार आहे. अकरा महिने कराराने देण्यात येणा-या या व्यायामशाळा चालविण्यापोटी संबंधित संस्थांना दरमहा दोन हजार रूपये सेवाशुल्क मिळणार आहे.

महापालिकेमार्फत शहरात 82 व्यायामशाळा चालविल्या जात आहेत. ज्या व्यायामशाळांना नागरिकांचा अल्प प्रतिसाद असेल, सभासद नसतील अशा व्यायामशाळांवर महापालिका कर्मचारी नियुक्त करणे महापालिकेचे आर्थिक हित लक्षात घेता परवडण्यासारखे नाही.

त्यामुळे महापालिका चालवित असलेल्या व्यायामशाळा सक्षम संस्था, मंडळे अशांकडून कराराने चालविण्यास घेण्याबाबतचे ठराव मंजुर करून घेतले आहेत. अशा 50 व्यायामशाळा दरमहा दोन हजार रूपये सेवाशुल्क तत्वावर महापालिका परिसरातील सार्वजनिक संस्था, मंडळे यांना 11 महिने कराराने चालविण्यास देण्यात आल्या आहेत.

शहरातील 50 व्यायामशाळांपैकी काही व्यायामशाळांचा मुदत कालावधी संपुष्टात आला आहे. या व्यायामशाळा सध्या संबंधित संस्थांच्या ताब्यात आहेत. 36 व्यायामशाळांनी पुन्हा मुदतवाढ मिळण्यासाठी महापालिकेकडे अर्ज केले आहेत.

महापालिकेच्या क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीची पाक्षिक सभा 11 डिसेंबर रोजी पार पडली. या सभेत 36 व्यायामशाळांना 11 महिने कराराने दरमहा दोन हजार रूपये सेवाशुल्क तत्वावर चालविण्यासाठी आदेशाच्या तारखेपासून मुदतवाढ देण्यात येणार आहे.

मुदतवाढ दिलेल्या व्यायामशाळांची नावे !

विद्यानगर-रामनगर व्यायामशाळा, चिंचवड येथील संभाजीनगर व्यायामशाळा, आकुर्डीतील येथील आकाश काळभोर व्यायामशाळा, निगडीतील बाहुबली व्यायामशाळा, सावित्रीबाई व्यायामशाळा, आकुर्डीतील छत्रपती शिवाजी महाराज जलतरण व्यायामशाळा, कैलास पांढरकर व्यायामशाळा, निगडीतील संजय काळे व्यायामशाळा, स्वातंत्र्यवीर सावरकर व्यायाम शाळा, चिंचवड येथील सुदर्शननगर महिला हेल्थ क्लब, किवळे गावठाण व्यायामशाळा, बिजलीनगर येथील दादोजी कोंडदेव व्यायामशाळा, गणेश व्यायामशाळा, तानाजी गावडे व्यायामशाळा, राजमाता जिजाऊ महिला व्यायामशाळा, बळवंत चिंचवडे व्यायाम शाळा, मासुळकर कॉलनीतील हेडगेवार क्रीडा संकुल, खराळवाडी पुरूष व्यायामशाळा, अण्णासाहेब मगर तलाव व्यायामशाळा, पिंपळे-निलख येथील बाबुराव भांडे व्यायामशाळा, पिंपळे-गुरव येथील शेवंताबाई साधू काशिद व्यायामशाळा, वैदुवस्ती व्यायामशाळा, पिंपळे-सौदागर येथील मुंजाबा चौक व्यायामशाळा, भोसरीतील भैरवनाथ व्यायामशाळा, सखुबाई गवळी उद्यान महिला व्यायामशाळा, कचदेव सिताराम लोंढे व्यायामशाळा, शिवराम डोळस व्यायामशाळा, यमुनानगर येथील बिंदुमाधव ठाकरे व्यायामशाळा, दिवंगत सौ. मिनाताई ठाकरे महिला व्यायामशाळा, यमुनानगर आणि राजनगर येथील मधुकर पवळे व्यायामशाळा, सांगवी महिला व्यायामशाळा, सदाशिव बहिरवाडे व्यायामशाळा, संत तुकारामनगर व्यायामशाळा, कासारवाडीतील साई शारदा महिला व्यायामशाळा, फुगेवाडी व्यायामशाळा आदी 36 व्यायामशाळांचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.