_MPC_DIR_MPU_III

Pimpri news: प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक बाबुराव करकंडे यांचे निधन

0

एमपीसी न्यूज – जुन्या पिढीतील बिल्डींग कॉन्ट्रॅक्टर, वारकरी सांप्रदायिक कुटुंबातील बाबुराव रामचंद्र करकंडे (74) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

अहमदनगर जिल्हयातील पारनेर तालुकयातील वडझिरे या गावातून पन्नास वर्षांपूर्वी पुण्यात येऊन बाबूराव करकंडे यांनी बिल्डींग कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम सुरू केले. प्रतिकुल परिस्थितीवर मात करून, जिद्द, चिकाटीच्या जोरावर त्यांनी स्वतःला आणि परिवाराला घडविले.

पुढे स्वतःचा बांधकाम व्यवसाय सुरू केला. कात्रज, धनकवडी, कोंढवा परिसरात त्यांनी अनेक प्रकल्प साकारले आहे. तसेच पंढरीची वारी आणि गावातील धार्मिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक किरण करकंडे यांचे ते वडील होत.

 

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment