Pimpri News : प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांना दिशा कार्यगौरव पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज – दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने ख्वाडा, बबन फेम (Pimpri News) प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांना “दिशा कार्यगौरव पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल व ज्येष्ठ सिनेमा अभ्यासक समर नखाते यांच्या हस्ते गुरूवारी (२३ मार्च) सांगवीत या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.

 

 

M.S. Dhoni : यंदाच्या आयपीएलनंतर धोनी होणार का निवृत? दीपक चहर म्हणाला..

 

 

नवी सांगवी, काटे पूरम येथील नटसम्राट निळूभाऊ फुले रंगमंदिरात गुरूवारी सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. भाजपचे नेते शंकर जगताप, अभिनेते पृथ्वीराज थोरात, अभिनेत्री कालींदी निस्ताणे आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमादरम्यान मुलाखतकार श्रीकांत चौगुले हे डॉ. पटेल तसेच नखाते यांच्याशी संवाद साधणार आहेत.

 

कऱ्हाडे यांचे पाच वर्षे सांगवीत वास्तव्य होते. त्याच सांगवीत गुरूवारी त्यांचा (Pimpri News)  सत्कार होत आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. प्रथम येईल, त्यास प्राधान्य राहणार आहे. काही जागा राखीव असतील, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ शिवले यांनी दिली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.