Pimpri News : पिंपरीतील प्रसिद्ध डॅाक्टर विजय नथानी यांचे निधन

एमपीसी न्यूज – पिंपरीतील प्रसिद्ध डॅाक्टर विजय नथाणी (67) यांचे दिर्घ आजारपणामुळे निधन झाले. 1980 मध्ये त्यांनी गरीब आणि गरजू लोकांसाठी चॅरिटेबल डिस्पेन्सरी उघडली होती. त्याचा हजारो लोकांना फायदा होत होता. नथानी यांच्या जाण्यानं गरिबांसाठी तळमळ असलेला डॉक्टर गमावल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

डॉ. नथानी आणि त्यांच्या मित्रांनी मिळून स्थापन केलेल्या सिंधू सेवा समितीच्या माध्यमातून हजारो गरजू व गरीब नागरिकांना माफक दारात उपचार दिले जात होते.

_MPC_DIR_MPU_II

तसेच मोठ मोठ्या रुग्णालयात गरीब नागरिकांना उपचार मिळावे यासाठी डॉ. नथानी प्रयत्नशील असायचे. दररोज 40 ते 50 रूग्णांची ते तपासणी करायचे.

गरिब आणि गरजू नागरिकांना माफक दारात उपचार उपलब्ध व्हावे यासाठी डॉ. नथानी प्रयत्नशील असायचे. त्यामुळे गरिबांसाठी तळमळ असलेला डॉक्टर गमावल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like