Pimpri News: न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार; कामगारांचा निर्धार

एमपीसी न्यूज – कामगार संघटनेचे (Pimpri News) सदस्यत्व स्वीकारुन युनियन केल्याचा राग आल्याने चाकण येथील एका कंपनीतील अधिकारी, कंत्राटदाराने मारहाण केल्याचा आरोप करत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी कामगार आज सकाळपासून उपोषणाला बसले आहेत. न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार कामगारांनी केला आहे.

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व कामगार आज (बुधवार) पासून उपोषणला बसले आहेत. 100 हून अधिक कामगार या उपोषणात आहेत. हे कामगार चाकण, खराबवाडीतील थेट उत्पादन प्रक्रियेत काम करत असलेल्या एका कंपनीत काम करतात. राष्ट्रीय श्रमिक आघाडी या संघटनेचे सभासदत्व स्वीकारल्याने कंपनीतील प्लांट हेड, एचआर, प्रोडक्शन मॅनेजर, डीसपॅच मॅनेजर आणि कंत्राटदाराने ‘युनियनचा राजीनामा द्या, नाही तर आम्ही प्रत्येकाला मारु’, ‘पोलीस स्टेशन आमच्या ताब्यात आहे’, ‘आम्ही तुमच्या विरोधात खोट्या तक्रारी देवून तुम्हाला तुरुंगात डांबु’ अशी धमकी दिल्याचा आरोप कामगारांनी केला.

Pimpri News : औद्योगिक पट्टयातील भूयारी गटार योजनेसह विविध समस्या मार्गी; उद्योग मंत्र्यांच्या उपस्थितीतील बैठकीत विविध निर्णय

राकेश कुमार ठाकूर या (Pimpri News) कामगाराला 10 ऑक्टोबर 2022 रोजी प्लांट हेडने केबिनमध्ये बोलावून घेतले. संघटना सोडण्यासाठी दबाव आणला, जीवे मारण्याची धमकी दिली. तर, ठेकेदाराने या कामगाराला मारहाण केल्याचा आरोप कामगारांनी केला. आम्हाला न्याय मिळावा, मारहाण करणा-या व जीवे मारण्याची धमकी देणा-या अधिकारी व ठेकेदारांविरोधात गुन्हा दाखल व्हावा. आम्हाला सेवेत कायम करुन कामावर घ्यावे, अशी मागणी कामगारांनी केली. आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही हटणार नाही. उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार या उपोषणाला बसलेल्या कामगारांनी केला.

राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे कामगार नेते यशवंत भोसले म्हणाले, संघटनेचे सभासदत्व स्वीकारने, आपल्या हक्कासाठी संघटना काढणे गुन्हा नाही. संघटना काढल्यामुळे कामगारांना मारहाण करणे अतिशय धक्कादायक आहे. याची तक्रारी देण्यास गेल्यास पोलिसांकडून ती दाखल करून घेतली गेली नाही. पोलिसांकडून कामगारांना न्याय मिळाला पाहिजे. या कामगारांना न्याय मिळावा, मारहाण करणा-या व जीवे मारण्याची धमकी देणा-या दोषी अधिकारी व ठेकेदाराविरोधात तत्काळ गुन्हा दाखल करावा. गेली दोन महिन्यापासून कामावर येण्यास मनाई केलेल्या कामगारांना सेवेत कायम करुन कामावर घ्यावे अशा मागण्यांसाठी कामगार बेमुदत उपोषणाला बसले आहेत. न्याय मिळेपर्यंत कामगार उपोषण करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.